सिंगल
By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST
पारधी समाजावरील अत्याचार थांबवा
सिंगल
पारधी समाजावरील अत्याचार थांबवानागपूर : पारधी समाजावर अन्याय करणाऱ्यावर अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करावी. दारु पकडण्याच्या नावाखाली पोलीस पारधी बेड्यावर धाड टाकून महिला व मुलांवर अत्याचार करीत आहे. जिल्ह्यातील उमठा येथे २७ जानेवारीला असा प्रकार घडला आहे. यासंदर्भात आदिवासी पारधी विकास परिषदेने पारधी समाजावर होणाऱ्या अत्याचार थांबविण्याची मागणी सरकारकडे केली आहे. कळमेश्वर तहसिल कार्यालयापुढे आमरण उपोषणाचा इशारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराव चव्हाण यांनी पत्रपरिषदेत दिला. एनएसयुआयचे कुलगुरूंना निवेदननागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी कॉलेज फंड, बिल्डींग फंड, डोनेशन, एक्स्ट्रा फी विद्यार्थ्यांकडून वसूल केली. यासंदर्भात विद्यापीठाकडे एनएसयुआयने तक्रार केल्यानंतर विद्यापीठाने २९ जानेवारीला अभिजित वंजारी यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठित करून, १५ दिवसात महाविद्यालयावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ८६ विद्यार्थ्यांनी समितीकडे लेखी तक्रारी केल्या. मात्र अद्यापही महाविद्यालयांवर कारवाई झाली नाही. यासंदर्भात एनएसयुआयतर्फे आज पुन्हा कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. २ मार्चपर्यंत सर्व तक्रारींचे निवारण करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरुंनी दिले असल्याचे आशिष मंडपे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.