शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

खोट्या कागदपत्रावर सिमीच्या आरोपीने मिळवला वाहन परवाना आरटीओ कॅम्पमधील प्रकार : मुंबई गुन्हे शाखेकडून प्रकरणाची चौकशी

By admin | Updated: October 21, 2016 00:18 IST

जळगाव : खोटे कागदपत्र सादर करून सिमीच्या आरोपीला आरटीओ कॅम्पमध्ये वाहन परवाना देण्यात आल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. एका वरिष्ठ अधिकार्‍याने जळगाव आरटीओंकडून माहिती मागविली आहे.या प्रकरणाची गोपनीय चौकशी सुरू आहे.

जळगाव : खोटे कागदपत्र सादर करून सिमीच्या आरोपीला आरटीओ कॅम्पमध्ये वाहन परवाना देण्यात आल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. एका वरिष्ठ अधिकार्‍याने जळगाव आरटीओंकडून माहिती मागविली आहे.या प्रकरणाची गोपनीय चौकशी सुरू आहे.
जिल्‘ातील प्रत्येक नागरिकाला जळगावात येऊन वाहन परवाना काढणे शक्य नसल्याने आरटीओ कार्यालयामार्फत प्रत्येक तालुकास्तरावर आठवड्यातून एकदा कॅम्पचे आयोजन केले जाते. मे महिन्यात भडगाव येथे झालेल्या अशाच एका कॅम्पमध्ये सिमीच्या आरोपीने बनावट कागदपत्र सादर करून वाहन परवाना मिळवला आहे.दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखा व एटीएसकडून त्याची गोपनीय चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणाच्या तपासाधिकार्‍यांनी यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधून काही माहिती मागवली आहे.
निरीक्षक व लिपीकाला नोटीस
कागदपत्रांची खातरजमा न करता वाहन परवाना दिल्याप्रकरणी संबंधित मोटार वाहन निरीक्षक व परवाना वितरण विभागाचे लिपीक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसच्या बाबतीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील व लिपिकाला विचारणा केली असता दोघांनी या वृत्ताचा इन्कार केला.
एटीएसकडून चौकशी सुरू
मुंबई एटीएसकडून राज्यातील सर्वच सिमीच्या आरोपींची चौकशी सुरू केली आहे. त्यांच्याकडे वाहन परवाना आहे का? असेल तर कोणाच्या नावावर आहे. त्यांनी आरटीओकडे कोणते कागदपत्र सादर केले आहेत, त्याने दिलेल्या पत्त्यावरच तो राहतो का? सद्यस्थितीच्या हालचालींवर लक्ष ठवले जात आहे. आरटीओ कार्यालयातीलही त्यांचे रेकॉर्ड तपासले जात आहे.
जिल्‘ात सिमीचे ४९ आरोपी
जळगाव जिल्‘ात सिमीचे ४९ आरोपी आहेत. त्यातील ११ जळगाव शहरात राहतात. एका आरोपीला फाशीची शिक्षा झाली आहे तर एक जण रेकॉर्डला फरार आहे. उर्वरित जिल्‘ाच्या इतर तालुकास्तरावर राहतात. एटीसीकडून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्‘ात बांग्लादेशींचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या लोकांनाही वाहन परवाना देण्यात आला आहे का? याचीही चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-कोट..
कायद्याच्या तरतुदीनुसार प्रत्येकाला वाहन परवाना काढण्याचा अधिकार आहे, मात्र एखाद्याने खोटे व बनावट कागदपत्र सादर केले असतील तर तो गुन्हाच आहे. या प्रकरणी मी कोणालाही नोटीस दिलेली नाही.
-जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी