शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सिक्कीम सीमेलगत कुमक वाढविली!

By admin | Updated: July 3, 2017 05:29 IST

सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेल्या डोका ला प्रदेशात चीनने सुरू केलेल्या रस्ता बांधणीवरून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गेले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेल्या डोका ला प्रदेशात चीनने सुरू केलेल्या रस्ता बांधणीवरून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गेले सुमारे महिनाभर सुरू असलेली तणातणी आणि घुसखोरी करूनही चीनने घेतलेला उलटा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन भारताने तेथील आपली स्थिती बळकट करण्यासाठी सीमेवर लष्कराची जादा कुमक तैनात केली आहे.अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. मात्र वाढीव सैन्य सीमेवर तैनात करणे याचा अर्थ युद्धाची तयारी करणे असा नाही. भारतीय सैन्य तेथे बंदुकींच्या नळ्या उलट्या दिशेला म्हणजे जमिनीकडे करून अनाक्रमक पवित्र्यात असतील, असे या सूत्रांनी आवर्जून स्पष्ट केले.चीनने सिक्कीम सीमेवरील या घटनाक्रमाचे निमित्त पुढे करून नथु ला खिंडीतून जाणारी कैलास-मानसरोवर यात्राही अडवून ठेवली. त्यामुळे चीन भारताला जेरीस आणण्याचे प्रयत्न सर्व पातळ्यांवर करत असल्याचे दिसते. परंतु भारताने आपली खंबीर भूमिका कायम ठेवून या दबावाला भीक घातलेली नाही.खुद्द लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनीही प्रत्यक्ष जागेवर जाऊन काही दिवसांपूर्वी परिस्थितीचा आढावा घेतला होता, हेही लक्षणीय आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तान, चीन व देशांतर्गत अशांतता अशा अडीच आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर समर्थपणे सज्ज आहे, अशी ग्वाहीही जनरल रावत यांनी दिली होती.डोका ला भागात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये शारीरिक रेटारेटी होऊन स्थिती गंभीर झाल्यावर भारतीय लष्कराने मेजर जनरल हुद्द्याच्या अधिकाऱ्याला तेथे पाठवून चीनच्या समकक्ष लष्करी अधिकाऱ्याशी ध्वजबैठक घेण्याचा प्रस्ताव दिला. दोनदा नकार दिल्यावर तिसऱ्या वेळी चीन ध्वजबैठकीला आला. पण डोका लाच्या लालटेन भागातून भारतानेच सैन्य काढून घ्यावे, असा उफराटा प्रस्ताव त्याने दिला.सिक्कीम सीमेवर सध्या उद््भवलेला तणाव हा १९६२ च्या युद्धानंतर भारत व चीन यांच्या सैन्यामध्ये सर्वात दीर्घकाळ सुरू राहिलेला तिढा आहे. विशेषकरून भारत आणि शेजारी भूतानने निषेध नोंदविल्यानंतर माघारी हटण्याऐवजी सीमेवरील चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घेतलेला आक्रमक पवित्रा, भारताचे सीमेवरील दोन बंकर नष्ट केले जाणे व चीनच्या राजनैतिक प्रतिक्रियेला चढलेली अधिक तिखट धार पाहता भारताने सावधानता म्हणून ही तयारी केली आहे. मुजोर चीनने आणला नवा नकाशासिक्कीम सीमेलगतचा डोका ला हा प्रदेश आपल्याच हद्दीत आहे व तेथे आपण नव्हे तर भारतीय सैनिकांनीच घुसखोरी केली, या आपल्या थापेबाजीला खरेपणाचा मुलामा चढविण्यासाठी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी बीजिंगमध्ये एक नवा नकाशा जारी केला.या नकाशात सीमेलगत सुरू असलेले रस्त्याचे बांधकाम थांबविण्यासाठी भारतीय सैनिक सीमा ओलांडून जेथून चीनच्या हद्दीत आले तो भाग निळ्या बाणांनी दाखविण्यात आला होता. हा वादग्रस्त रस्ता चीनच्या जागेत नव्हे तर आपल्या हद्दीत बांधला जात आहे, असे स्पष्ट करून भूतानने भारतासोबत या दादागिरीचा निषेध केला.