शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

हेरगिरी प्रकरणात मोदींच्या चौकशीचे संकेत

By admin | Updated: May 2, 2014 15:15 IST

गुजरातमधील सरकारी यंत्रणांचा वापर करुन आर्किटेक्ट महिलेची हेरगिरी केल्याप्रकरणी नरेंद्र मोदींची चौकशी करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.

ऑनलाइन टीमनवी दिल्ली, दि. २ - गुजरातमधील सरकारी यंत्रणांचा वापर करुन आर्किटेक्ट महिलेची हेरगिरी केल्याप्रकरणी नरेंद्र मोदींची चौकशी करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. १६ मेपूर्वी मोदींची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची १६ मेपूर्वी नेमणूक करु अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी दिली आहे. बंगळुरुतील एका आर्किटेक्ट महिलेवर मोदींच्या आदेशानुसार गुजरात पोलिसांनी पाळत ठेवल्याचे एका स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाले होते. याप्रकरणी काँग्रेसने नरेंद्र मोदींवर वारंवार टीकास्त्र सोडले आहे. आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच केंद्र सरकारने मोदींच्या चौकशीचे संकेत दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखातीमध्ये हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे म्हटले आहे. तर शुक्रवारी केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनीदेखील या प्रकरणात १६ मेपूर्वी चौकशी समितीचे नेमणूक होऊ शकते अशी माहिती दिली आहे. हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीचा निर्णय निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच घेण्यात आला होता. त्यामुळे आता चौकशी समितीची नियुक्ती झाल्यास आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही असे स्पष्टीकरण या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे. भाजपने निवडणुकी दरम्यान चौकशी समिती नेमल्यास आचारसंहितेचा भंग ठरेल व याविरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेऊ असा इशारा दिला होता. मात्र सिब्बल यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड यांना या चौकशी समितीसाठी न्यायाधीशांची नेमणूक करण्याची शिफारस केंद्र सरकारने केली आहे. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या मोसमात मोदींची चौकशी सुरु करुन विरोधकांची कोंडी करण्याची रणनिती सत्ताधारी काँग्रेसने आखली आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.