शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

सिद्धू यांचा खासदारकीचा राजीनामा!

By admin | Updated: July 19, 2016 04:55 IST

‘‘चूक की बरोबर या युद्धामध्ये तुम्हाला काहीसे स्वार्थी राहण्यापेक्षा तटस्थ राहणे परवडणारे नसते. पंजाब राज्याचे हित हे सर्वोच्च आहे’’

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- ‘‘चूक की बरोबर या युद्धामध्ये तुम्हाला काहीसे स्वार्थी राहण्यापेक्षा तटस्थ राहणे परवडणारे नसते. पंजाब राज्याचे हित हे सर्वोच्च आहे’’, अशी भूमिका घेत भाजपचे राज्यसभा सदस्य नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्षाला मोठा धक्का दिला. सिद्धू पक्ष लगेचच सोडणार का हे स्पष्ट नाही तसेच त्यांनी भविष्यात काय करायचे हेही सांगितलेले नाही. मात्र त्यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून त्यांच्या प्रवासाबद्दल काही संकेत मिळतात.सिद्धू यांना पंजाबच्या पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सक्रिय भूमिका बजवायची आहे आणि भाजप त्यांना राज्यसभेत आणि टीव्ही शोजमध्ये बंदिस्त करू इच्छिचे हे स्पष्ट आहे. परंतु त्यांनी अचानकच राजीनामा देऊन पक्षाला धक्का दिला. पक्षाने त्यांचा राजीनामा रोखण्याचे केलेले सगळे अपयशी ठरले.तथापि, नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांनी याआधीच भाजप सोडला असून बहुधा त्या आम आदमी पार्टीत (आप) प्रवेश करतील. नवज्योत कौर यांनी भाजपचा राजीनामा फेसबुक पेजवर टाकला होता. भाजपने अकालींबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर नवज्योत कौर यांनी त्याला स्पष्टपणे विरोध केला होता. परंतु भाजपच्या नेत्यांनी अकालींबरोबर ‘तरून जाऊ किंवा बुडून’ असे ठरविले होते. राज्यसभेत सिद्धू यांना राष्ट्रपतींकडून होणाऱ्या नियुक्तीद्वारे पाठविण्याचा निर्णय झाल्यावर त्यांनी संताप व्यक्त केला होता. भाजपने त्यांना राजकीय भूमिका देण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले नाही. सिद्धू हे आम आदमी पार्टीसाठी निवडणुकीत प्रचार करताना दिसू शकतात व नंतर ‘आप’तर्फे त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून समोर आणले जाऊ शकते. ‘आप’चे पंजाबमधून लोकप्रिय भगवान मान यांच्यासह चार खासदार असले तरी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्याकडे उमेदवार नाही. ‘आप’साठी सिद्धू हे योग्य ठरतात.‘पंजाबचे लोक बदल बघू इच्छितात,’ असे सिद्धू राजीनामा देण्यापूर्वी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले होते परंतु कोणालाही ते सदस्यत्व सोडतील अशी शंकाही आली नाही. नंतर त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात आपले पद हे ‘ओझे’ असल्याचे सूचित करून पक्षाबद्दलची आपली नाराजीच व्यक्त केली. ‘पंजाबकडे जाणारी प्रत्येक खिडकी बंद केल्यामुळे उद्देशच पराभूत झाला. आता केवळ ओझे राहिले असून ते आणखी पुढे वाहून न्यायचे नाही, असे मी ठरविले आहे’, असे नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले. सिद्धू हे माजी क्रिकेटपटू व समालोचक म्हणून प्रसिद्ध आहेत.सिद्धू यांनी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्या कार्यालयात जाऊन राजीनामा सादर केला. राजीनामा तत्काळ स्विकारला जावा अशी त्यांची इच्छा होती परंतु अन्सारी यांनी पुन्हा एकदा विचार करा, असे त्यांना म्हटले. परंतु सिद्धू यांची तशी इच्छा नव्हती. पक्षाचे नेते मुक्तार अब्बास नक्वी यांनी या घडामोडी रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला उशीर झाला होता.२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत अमृतसर मतदार संघातून अरूण जेटली यांच्यासाठी सिद्धू यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती त्यामुळेही ते नाराजच होते. खरे तर सिद्धू या मतदार संघाचे दहा वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत होते. जेटली यांना मात्र पराभवाला तोंड द्यावे लागले होते.सिद्धू यांच्या राज्यसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याचे आम्ही स्वागत करतो. तुम्हाला आणखी काही विचारावेसे वाटेल म्हणून सांगतो की तो निर्णय अचानक झालेला आहे, असे आपचे नेते संजय सिंग वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.>भाजपच्या श्रेष्ठींनी मंत्रिमंडळात शीख समाजातून प्रतिनिधी म्हणून दार्जिलिंगचे खासदार एस. एस. अहलुवालिया यांना संधी दिल्याबद्दलही सिद्धू नाराज होते. साहजिकच त्यांनी काही दिवस जाऊ दिले व संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच पहिल्या दिवशी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.