शटर तोडून १.५ लाखाचा मुद्देमाल पळविला
By admin | Updated: April 25, 2015 02:10 IST
शटर तोडून १.५ लाखाचा मुद्देमाल पळविला
शटर तोडून १.५ लाखाचा मुद्देमाल पळविला
शटर तोडून १.५ लाखाचा मुद्देमाल पळविलानागपूर : हार्डवेअरच्या दुकानाचे शटर तोडून दुकानातील १ लाख ५ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बापूनगर गोधनी रोडवर मंगळवारी रात्री ९.३० ते बुधवारी सकाळी १० दरम्यान घडली. सुरुउद्दीन हुसेन सुरतवाला (४३) रा. भारत माता चौक, कैलास टॉकीज मागे, पाचपावली हे गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बापूनगर, गोधनी रोड झिंगाबाई टाकळी येथील मुकदल हार्डवेअर नावाचे दुकान बंद करून आपल्या घरी गेले. दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाच्या मागील शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने दुकानातील नळ फिटींगचे प्रयाग कंपनी व एस. के. कंपनीचे निप्पल आणि रोख २५ हजार असा एकूण १ लाख ५ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. गिट्टीखदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ..............