क्रिकेट स्पर्धेत श्रीराम संघ अजिंक्य
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
निफाड : येथील उत्कर्ष क्रिकेट क्लबतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त झालेल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत करंजगावच्या श्रीराम इलेव्हन संघाने अजिंक्यपद मिळविले. नाशिक तालुक्यातील कालवी संघाला पराभूत करीत श्रीराम इलेव्हन संघाने करंजगाव क्रिकेट स्पर्धेत बाजी मारली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ग्रामपालिका पटांगणात झाला. अध्यक्षस्थानीमाजी सरपंच सुरेशबापू राजोळे होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख म्हणून पंचायत समिती सदस्य सोपान खालकर, गटनेते रावसाहे पाटील राजोळे, उपसरपंच नामदेव राजोळे, संजय राजोळे, माधव राजोळे, सुदर्शन राजोळे, प्रभाकर लचके, मधुकर राजोळे, भाऊसाहेब राजोळे, भाऊसाहेब दराडे उपस्थित होते.