श्री स्वामी समर्थ सूतगिरणी निवडणूक : २४ अर्ज नामंजूर विद्यमान संचालकांचाही समावेश
By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST
दक्षिण सोलापूर : वळसंग येथील श्री स्वामी समर्थ सहकारी विणकरी सूत गिरणीच्या निवडणुकीतील २४ उमेदवारांचे अर्ज छाननीत नामंजूर करण्यात आले़ त्यात जि़प़सदस्या श्रीदेवी पाटील, हरीष गुरुनाथ पाटील, जगदीश आंटद यांचा समावेश आहे़
श्री स्वामी समर्थ सूतगिरणी निवडणूक : २४ अर्ज नामंजूर विद्यमान संचालकांचाही समावेश
दक्षिण सोलापूर : वळसंग येथील श्री स्वामी समर्थ सहकारी विणकरी सूत गिरणीच्या निवडणुकीतील २४ उमेदवारांचे अर्ज छाननीत नामंजूर करण्यात आले़ त्यात जि़प़सदस्या श्रीदेवी पाटील, हरीष गुरुनाथ पाटील, जगदीश आंटद यांचा समावेश आहे़कापूस उत्पादक गटातील उमेदवारांच्या सात-बारा उतार्यावर कापूस पिकाची नोंद नसल्याने पाच उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले़ त्यात कासीम अंमलीचंुगे, जगदीश आंटद, महादेवी नागनाथ कोणदे, हरीष गुरुनाथ पाटील, नुसरुद्दीन शेख यांचा समावेश आहे़ याच गटातील बसवराज हौदे यांना तीन अपत्ये असल्याचा पुरावा सादर केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला़बिगर कापूस उत्पादक गटातील उमेदवारांनी अर्जासोबत सात-बारा उतारा जोडला नसल्याने ते शेतकरी असल्याचे स्पष्ट होत नाहीत त्यामुळे १० उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले़ त्यात चौडप्पा धनाळी, सिद्धेश्वर झुंजा, शिवानंद खैराटे, सुरेश माशाळे, मल्लिकार्जुन मड्डे, बसप्पा शेे, इष्टलिंग रोे, आडव्याप्पा सरसंबी, विजयकुमार थळंगे यांचा समावेश आहे़महिला प्रतिनिधीच्या दोन जागांसाठी ७ अर्ज प्राप्त झाले असून कस्तुरा रामलिंग चनशेी,श्रीदेवी गुरुनाथ पाटील यांचे अर्ज अवैध ठरले आहेत़ अनुसूचित जाती जमातीच्या जागेसाठी अर्ज दाखल केलेल्या शंकर दोडमनी, सोमनिंग सीताफळे यांनी विहित नमुन्यातील जातीचे दाखले अर्जासोबत जोडले नाहीत़ त्यामुळे त्यांचे अर्ज अवैध ठरले आहेत़ इतर मागास प्रवर्ग आणि भटक्या जाती विमुक्त जाती प्रवर्गातील सर्वच अर्ज मंजूर झाले आहेत़