शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ प्रातंाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस एकनाथ डवले : प्रलंबित केसेस व रोहयो कामाच्या संथगतीवरून नाराजी ; वसुलीकडे दुर्लक्ष करणारे चार प्रातांधिकारी

By admin | Updated: February 5, 2016 00:33 IST

जळगाव : जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या केआरए अंतर्गत प्रलंबित प्रकरणांमध्ये निकाल देण्यासाठी विलंब लावल्याप्रकरणी नाशिक विभागाचे आयुक्त एकनाथ डवले यांनी भुसावळचे प्रातांधिकारी विजय भांगरे यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश दिले. यावेळी रोजगार हमी योजनेच्या कामाच्या संथ गतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

जळगाव : जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या केआरए अंतर्गत प्रलंबित प्रकरणांमध्ये निकाल देण्यासाठी विलंब लावल्याप्रकरणी नाशिक विभागाचे आयुक्त एकनाथ डवले यांनी भुसावळचे प्रातांधिकारी विजय भांगरे यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश दिले. यावेळी रोजगार हमी योजनेच्या कामाच्या संथ गतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीस रोहयोचे विभागीय उपायुक्त पुरी, विभागीय उपायुक्त सतीश देशमुख, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते.
भुसावळला सर्वाधिक प्रलंबित केसेस
केआरए अंतर्गत येणार्‍या प्रलंबित केसेस, फेरफार नोंदी यासह प्रातांधिकारी यांच्याकडे असलेल्या प्रलंबित कामांबाबतची माहिती त्यांनी घेतली. यात सर्वाधिक १५५ केसेस या भुसावळचे प्रातांधिकारी विजय भांगरे यांच्या असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले. चाळीसगाव तहसीलदार यांच्याकडे १५८ केसेस प्रलंबित असल्याने त्याबाबत नाराजी व्यक्त केली. ३० सप्टेंबर २०१५ अखेर दाखल असलेल्या केसेस मार्च २०१६ पर्यंत निकाली काढण्याचे आदेश त्यांनी दिले.
रोहयोबाबत व्यक्त केली नाराजी
रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्‘ात सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या संथगतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांमधील मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणानिहाय जबाबदारी निश्चित करून द्यावी असे आदेश त्यांनी दिले. तसेच ज्या मजुराकडे जॉब कार्ड नसतील त्यांना तत्काळ ते तयार करून देऊन मजुरांना कामे द्यावे असे आदेश त्यांनी केले.
जलयुक्तसाठी आठ दिवसात प्रशासकीय मान्यता द्या
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २३२ गावांसाठी १६८ कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन जिल्हा प्रशासनाचे आहेत. उर्वरित कामांना आठ दिवसात प्रशासकीय मान्यता देऊन कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. शेततळे, नाला खोलीकरण ही कामे लोकसहभागातून करण्यावर भर द्यावा तसेच ही कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्याची सूचना त्यांनी केली. मार्च महिन्याअखेर जलयुक्त शिवार योजनेचे कामे पूर्ण झाले पाहिजे असे आदेश त्यांनी दिले.