शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास गेल्यास वाजते शिट्टी

By admin | Updated: July 13, 2015 17:26 IST

मध्य प्रदेशमधील एका गावात उघड्यावर शौचाला जणा-यांना बघून बाल पथक जोरजोरात शिट्टी वाजवतात.

ऑनलाइन लोकमत 

भोपाळ, दि. १३  - मध्यप्रदेशमधील गाडरवाडा गावात आता कोणीही उघड्यावर शौचास जाण्याची हिंमत करत नाही.... गावातील सरकारी यंत्रणेने ग्रामस्थांच्या मदतीने एका पथकाची स्थापना केली असून हे पथक उघड्यावर शौचाला जणा-यांना बघून जोरजोरात शिट्टी वाजवतात. त्यामुळे समोरचा व्यक्ती कंटाळून उघड्यावर शौचावर जाणे बंद करतो. 
स्वच्छ भारत अभियान गावागावात पोहोचवण्यासाठी मध्य प्रदेशमधील सरकारी यंत्रणांनी कंबर कसली असून जिल्हाधिकारी महेशचंद्र चौधरी यांनी स्वच्छतेसाठी नवीन शक्कल लढवली. त्यांनी गाडरवाडा गावातील ग्रामस्थांसोबत चर्चा करुन गावातील घराघरात शौचालय बांधण्यावर भर दिला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले व गावातील घराघरात शौचालय बांधण्यात आले. मात्र यानंतरही उघड्यावर शौचासाठी जाण्याची पद्धत बंद पडणार नव्हती. यावर लगाम लावण्यासाठी चौघरी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने एक बाल पथक तयार केले.  हे पथक उघड्यावर शौचाला जाणारा किंवा बसलेला व्यक्ती दिसला की जोरजोरात शिट्टी वाजवून त्याच्या नाकी नऊ आणतात. हे पथक गावातील अन्य लोकांना उघड्यावर शौचास गेल्याने होणारे दुष्परिणामही समजावून सांगतात. आता या गावात जलयोजनाही राबवण्यात येत असून या गावातील विकासयात्रा बघून अन्य गावातील ग्रामस्थही आता स्वच्छता अभियानासाठी पुढाकार घेत आहेत.