शासकीय कार्यक्रमाला जिल्ात अल्प प्रतिसाद - जोड
By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST
विशेष म्हणजे खाजगी अनुदानित, विना अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक, कायम विनाअनुदानित, स्वयं-अर्थसहाय्यीत, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना हा कार्यक्रम ऐच्छिक स्वरूपाचा होता. इच्छुक असणाऱ्या शाळांना सवलतीच्या दरात रोप शासन उपलब्ध करून देणार होते. मात्र वृक्षाच्या संरक्षण आणि संगोपनाची जबाबदारी शाळा घेण्यास तयार नसल्यामुळे, या शाळांनी वृक्षारोपणासाठी ...
शासकीय कार्यक्रमाला जिल्ात अल्प प्रतिसाद - जोड
विशेष म्हणजे खाजगी अनुदानित, विना अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक, कायम विनाअनुदानित, स्वयं-अर्थसहाय्यीत, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना हा कार्यक्रम ऐच्छिक स्वरूपाचा होता. इच्छुक असणाऱ्या शाळांना सवलतीच्या दरात रोप शासन उपलब्ध करून देणार होते. मात्र वृक्षाच्या संरक्षण आणि संगोपनाची जबाबदारी शाळा घेण्यास तयार नसल्यामुळे, या शाळांनी वृक्षारोपणासाठी पुढाकारच घेतला नाही, अशी माहिती आहे. :::चौकट:::अनेक शाळांमध्ये वृक्षारोपणासाठी जागाच नाहीशहरातील अनेक शाळांनी इमारती बहुमजली केल्या, मात्र खेळाचे मैदान उपलब्ध केले नाही. जागाच नसल्यामुळे वृक्षारोपण कार्यक्रमात शाळांनी भाग घेतला नाही. शिवाय वृक्षारोपणानंतर त्याची जबाबदारी स्वीकारून, डोकेदुखी वाढवून घेण्यापेक्षा वृक्षारोपण करायचेच नाही, अशी भूमिकाही शाळांनी घेतली. त्यामुळे वृक्षारोपणाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.