शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

थोडक्यात नागपूर

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

विश्वकर्मा जयंतीनिमित्त कार्यक्रमनागपूर : अखिल भारतीय विश्वकर्मा विकास मंडळ जगनाडे चौक नागपूरतर्फे विश्वकर्मा जयंतीचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष विष्णुपंत मोरेकर, राजेश लाखेकर यांनी पूजा केली. यावेळी डॉ. अभय ठाकरे आणि त्यांच्या चमूने रक्तदान व मधुमेह तपासणी करून औषध वितरण केले. टिकेकर महाराज यांनी गोपालकाल्याचे कीर्तनातून विश्वकर्मा यांच्याबद्दल माहिती दिली. ...


विश्वकर्मा जयंतीनिमित्त कार्यक्रम
नागपूर : अखिल भारतीय विश्वकर्मा विकास मंडळ जगनाडे चौक नागपूरतर्फे विश्वकर्मा जयंतीचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष विष्णुपंत मोरेकर, राजेश लाखेकर यांनी पूजा केली. यावेळी डॉ. अभय ठाकरे आणि त्यांच्या चमूने रक्तदान व मधुमेह तपासणी करून औषध वितरण केले. टिकेकर महाराज यांनी गोपालकाल्याचे कीर्तनातून विश्वकर्मा यांच्याबद्दल माहिती दिली. राजाभाऊ पोफळी यांनी विश्वकर्मा संस्थांच्या इतिहासातील घडामोडींचा उल्लेख केला. शंकर कोळमकर यांनी समाजाने पूर्वीचा सन्मान मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. दत्तात्रय देऊळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महिलांचे स्वास्थ व सौंदर्यशास्त्र या विषयावर वर्षा लाखेकर, लतिका मोरेकर, वैष्णवी गरुडकर, ज्योती राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी समाजभवनाच्या बांधकामासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमात समाजभवनासाठी देणगी देणाऱ्या समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला.

गायत्री परिवारातर्फे चिन्मय पंड्या यांचे स्वागत
नागपूर : गायत्री परिवार ट्रस्टच्या वतीने गायत्री कुंज हरिद्वारच्या देव संस्कृती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. चिन्मय पंड्या यांच्या नागपूर प्रथम आगमनानिमित्त नंदनवन जगनाडे चौकातील गायत्री शक्तिपीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गायत्री परिवाराचे सत्यनारायण नुवाल उपस्थित होते. डॉ. चिन्मय पंड्या यांनी उपस्थित युवकांना प्राचीन भारतीय साहित्याचा अभ्यास करून आध्यात्मिक जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. संचालन बंडू मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला गायत्री परिवारातील सदस्य आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दक्षिण नागपुरातील ले-आऊटबाबत सभापतींना निवेदन
नागपूर : दक्षिण नागपुरातील नासुप्र ले आऊटमधील विविध आरक्षण वगळणे, एन. डी. झेडमध्ये पूर्वी असलेल्या आरक्षणातील भूखंडधारकांना मागणीपत्र द्यावे तसेच संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास करावा या मागण्यांबाबत आमदार सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी नासुप्रच्या सभापतींना निवेदन सादर केले. दक्षिण नागपुरात विविध ले-आऊट एन. डी. झेड अंतर्गत आरक्षणात होते. परंतु एन. डी. झेड. आरक्षण आता वगळण्यात आले आहे. अद्यापपर्यंत ले आऊटमध्ये भूखंडधारकांना मागणीपत्र देण्यात आले नाही. यावेळी सभापतींनी भूखंडधारकांना मागणीपत्र देण्याचे आश्वासन दिले. यावेळी रविंद्र भोयर, नगरसेवक रमेश सिंगारे, नगरसेविका स्वाती आखतकर, चंद्रकांत आखतकर, संजय ठाकरे, किरण दातील, रिना ठाकूर, राजु गडेकर, कैलाश कोरडे उपस्थित होते.