थोडक्यात नागपूर
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
जिल्हा विधीसेवा प्राधीकरण
थोडक्यात नागपूर
जिल्हा विधीसेवा प्राधीकरण नागपूर : जिल्हा विधी सेवा प्राधीकरण व नवजीवन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ४ फेब्रुवारी रोजी तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, सिव्हिल लाईन्स येथे न्याय सर्वांसाठी विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी स्वागतपर व प्रास्ताविकपर भाषण केले. जिल्हा विधीसेवा प्राधीकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी उपस्थित समाजकार्य शाखेच्या विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची उद्देशिका समजावून सांगितली. कायदेविषयक मोफत साहाय्य हे फक्त धर्मदाय नसून ते संवैधनिक कर्तव्य आहे त्यांनी यावेळी लोक अदालतीची माहिती दिली. लोक अदालतीच्या माध्यमातून लाखो लोकांनी लाभ घेतला आहे. ॲड. प्रदीप अग्रवाल यांनी विविध उदाहरणांनी हा विषय समजावून सांगताना माहितीचा अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. ॲड. फिलोमिना पिचापल्ली यांनी अटक केलेल्या व्यक्तींच्या हक्कांबाबत माहिती दिली. संचालन दीपक मसराम यांनी तर अरुणा गजभिये यांनी आभार मानले.