थोडक्यात... जोड
By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST
आशा सेविकांचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन
थोडक्यात... जोड
आशा सेविकांचे ऊर्जामंत्र्यांना निवेदनकोदामेंढी : स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आशा सेविकांनी आपल्या विविध समस्यांबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आरोग्य मंत्री दीपक सावंत यांना निवेदन सादर केले. आशा सेविकांच्या शिष्टमंडळाने निवेदनात मानधन अत्यल्प असून अतिरिक्त कामाचा मोबदला एकाच शीर्षकाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रातून एकत्रित देण्याची मागणी केली. तसेच कार्यक्षेत्राबाहेरील प्रसूतीकरिता रुग्णांसोबत जावे लागते. त्या ठिकाणी आशा कार्यकर्तीला राहण्याची सोय व जेवणाची सोय देण्यात यावी, अथवा त्या दिवशीचा खर्च देण्यात यावा. ग्रामीण भागात काम करीत असताना रात्रंदिवस वेळेची वाट न पाहता आशा रुग्णसेवा प्रदान करतात. यासाठी मोबाईलद्वारे संपर्क साधावा लागतो. हा खर्च शासनामार्फत दिला जावा. सर्व आशा सेविकांना विमा योजनेचे संरक्षण मिळणे आवश्यक आहे, आदी मागण्या निवदेनातून केल्या आहे. प्रसंगी सेविकांच्या मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय देण्याचे आश्वासन ना. बावनकुळे यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात गायत्री थोटे, दयावंती आस्वले, रंजना श्रावणकर, कुंदा येळणे, सूर्यकांता बावनकुळे, दुर्गा ढोमणे आदींचा समावेश होता. (वार्ताहर).........पाच खेळाडूंची राज्य संघात निवडखापरखेडा : राज्य टग ऑफ वॉर असोसिएशन व जळगाव जिल्हा टग ऑफ वॉर असोसिएशन बोदवड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सब ज्युनिअर रस्सीखेच स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत नागपूर जिल्हा मुलींच्या संघाने ३६० किलो वजनगटात उल्लेखनीय कामगिरी करून द्वितीय क्रमांक पटकावला. सदर मुलींचा संघ उपविजेते पदाचा मानकरी ठरला. या संघात प्रगती मोरेश्वर रेवतकर, कुसुम मनोज खापेकर, साक्षी बबलू सोनटक्के यांचा समावेश होता. तसेच १५ वर्षाखालील ४४० किलो वजनगटात मुलांचा संघ चौथ्या क्रमांकावर होता. यात पीयूष गजानन भोकरे, राजन मनोज मिश्रा या खेळाडूंनी सहभाग घेतला. तामिळनाडूमधील सेलम येथे राष्ट्रीय सब ज्युनिअर रस्सीखेच स्पर्धेकरिता या पाच खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली. सदर पाचही खेळाडू स्थानिक महाराष्ट्र विद्यालयात नियमित सराव करतात. त्यांच्या या यशासाठी सुनील केदार, मुख्याध्यापक एल. आर. राठोड, धैर्यशील सुटे, बबलू सोनटक्के, आशिष उपासे, राजकुमार परिहार, नीतेश घरडे, निखिल मेंढेकर, ओमप्रकाश चौधरी आदींनी कौतुक केले. (प्रतिनिधी)