शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात...

By admin | Updated: February 8, 2016 22:55 IST

तेली समाज महिला मंडळाचा स्नेह मेळावा उत्साहात

तेली समाज महिला मंडळाचा स्नेह मेळावा उत्साहात
(फोटो)
जळगाव : श्री संतजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे स्नेह सम्मेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले.
सुरुवातीला प्रमुख अतिथी मुख्याध्यापक कल्पना बावस्कर, नगरसेविका मंगला चौधरी, प्रमिला चौधरी, सुनंदा चौधरी, सुनीता चौधरी उपस्थित होत्या. यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वालन करण्यात आले. कार्यक्रमात मुलींसाठी डान्स स्पर्धा व महिलांसाठी उखाणे स्पर्धांसह विविध कार्यक्रम झाले. यातील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यशस्वीतेसाठी आशा सोनवणे, मीनाक्षी पाटील, लता चौधरी, उषा चौधरी, आशा महाले, शारदा पाटील, मंगला पाटील, पल्लवी चौधरी, कीर्ती चौधरी,वंदना देवरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुनंदा चौधरी यांनी तर आभार उषा चौधरी यांनी मानले.

सुभद्रा चौधरी विद्यालयाचा नामकरण सोहळा उत्साहात
जळगाव : समर्पण संस्था संचलित सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालयाचा नामकरण सोहळा उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जनता बँक व विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी प्राचार्य अनिल राव होते.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खेवलकर होत्या. मंचावर कमलाकर धांडे, सदाशिव महाजन, संजय भावसार, अनिल भोळे, इंदिरा अच्युत, चेतन नन्नवरे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांसह ॲड. एच. ए. चौधरी, प्रभाकर अच्युत यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले. सूत्रसंचालन सविता भोळे यांनी तर अभार सदाशिव महाजन यांनी मानले.

प्रबुद्ध महिला मंडळातर्फे रमाई जयंती साजरी
जळगाव : प्रबुद्ध महिला मंडळातर्फे रमाबाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने रेल्वे स्थानका शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विशेष कार्यक्रम झाला. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, शिलांबरी जमदाळे, तायडेे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात अला. यावेळी दर्जी फाउंडेशनचे गोपाल दर्जी यांचा संविधान पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.