शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतरही शिकण्याची जिद्द, पण घरच्यांचा विरोध; महिला थेट हायव्होल्टेज टॉवरवर चढली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:46 IST

Sholay Style Protest in Indore: इंदूरच्या बौरसी गावात नुकताच एक अंगावर काटा आणणारा थरार पाहायला मिळाला. अज्जू बाई नावाच्या एका विवाहित तरुणीला लग्नानंतरही तिचे शिक्षण पूर्ण करायचे होते, मात्र कुटुंबाने तिला अभ्यासापासून रोखले. या निर्णयामुळे निराश झालेल्या या तरुणीने थेट गावच्या ४०० केव्ही वीज टॉवरवर चढून 'शोले' स्टाईल आंदोलन केले.

मध्य प्रदेशातील इंदूर जिल्हा येथील बौरसी गावात एका विवाहित तरुणीने पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी धक्कादायक पाऊल उचलले. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी तरुणीचे शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणीने गावातील ४०० केव्ही क्षमतेच्या वीज टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले. प्रशासन आणि ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून तिला सुखरूप खाली उतरवण्यात यश आले.

अज्जू बाई असे या तरुणीचे नाव असून तिचे लग्न झालेले आहे. मात्र, लग्नानंतर तिला पुढेही शिक्षण सुरू ठेवायचे होते. कुटुंबीयांनी तिच्या इच्छेला विरोध करत अभ्यास थांबवण्याचा निर्णय घेतल्याने ती संतप्त झाली. त्यानंतर ती गावाच्या शिवारातील ४०० केव्ही ट्रान्समिशन लाईनच्या टॉवरवर चढली.

सकाळी गावकऱ्यांनी तिला टॉवरवर चढताना पाहताच परिसरात खळबळ उडाली. तत्काळ मध्य प्रदेश पॉवर ट्रान्समिशन कंपनीच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सहायक अभियंता राजेंद्र कनोजे आणि रवींद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. उच्च क्षमतेच्या वीज वाहिन्यांच्या जवळ जाणेही जीवघेणे ठरू शकते, हे लक्षात घेऊन कोणालाही टॉवरवर चढण्यास मज्जाव करण्यात आला.

बचाव पथकाने थेट कारवाई करण्याऐवजी समुपदेशनाचा मार्ग अवलंबला. कुटुंबीयांच्या मदतीने तरुणीशी संवाद साधण्यात आला. अखेर तिला पुढील शिक्षणासाठी परवानगी देण्याचे आश्वासन देण्यात आले. काही तासाने तरुणी स्वतःहून खाली उतरली. सुदैवाने, या घटनेत तिला कोणताही इजा झाली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Denied Education, Indian Woman Climbs High-Voltage Tower in Protest

Web Summary : An Indian woman climbed a 400kV power tower after her family forbade her from continuing her education post-marriage. Authorities persuaded her to descend by promising to allow her to study further. She was unharmed.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलindore-pcइंदौर