शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी कापले जवानांचे गुप्तांग

By admin | Updated: April 27, 2017 10:14 IST

छत्तीसगड येथील सुकमामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याबाबत दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

रायपूर, दि. 27 - छत्तीसगड येथील सुकमामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याबाबत दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहेत. यातच आता समोर आलेली माहितीही खळबळजनक आहे. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानांची हत्या केल्यानंतर नक्षलवाद्यांनी यातील काहींचे गुप्तांग कापले. सोमवारी करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्यात 25 जवान शहीद झाले.
 
यानंतर, शहीद झालेल्या काही जवानांचे गुप्तांग कापण्यात आले आहे. ही धक्कादायक बाब घटनास्थळी शहिदांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोहोचलेल्या बचाव पथकाच्या लक्षात आली. तर काहींचे चेहरे आणि डोके ठेचण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. शहीद जवानांच्या मृतदेहाची अशा प्रकारे विटंबना करण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 
 
एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितले की, शहीद झालेल्या काही जवानांचे अंग कापण्यात आले, एवढची माहिती सध्या आम्ही देऊ शकतो. दरम्यान, सुरक्षा दलासहीत स्थानिक आदिवासी नागरिकांना कठोर संदेश देण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी हे कुकृत्य केल्याचे बोलले जात आहे. 
सूत्रांच्या माहितीनुसार, नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मृतदेहाची कधीही विटंबना करत नाहीत. पण, सुरक्षा दलाकडून राबवण्यात येणा-या ऑपरेशदरम्यान कथित बलात्कार आणि छेडछाडीचा बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी हे कृत्य केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे याद्वारे स्थानिक आदिवासी नागरिकांनीही सुरक्षा रक्षकांना मदत करू नये, असा संदेश देण्यासाठी नक्षलवाद्यांनी कुकृत्याचं टोकं गाठले आहे. 
 
असा भ्याड हल्ला करून नक्षलवादी सुरक्षा रक्षकांमध्ये भीती पसरवण्याचा प्रयत्न करू पाहत असल्याचे एका अधिका-यानं सांगितले.  यापूर्वीही नक्षलवाद्यांनी अशाच प्रकारचे संतापजनक कृत्य केले होते. 2007मध्ये छत्तीसगड येथील बीजापूरमध्ये लष्करी छावणीवर हल्ला करत शहीद झालेल्या जवानांच्या मृतदेहांची विटंबना करण्यात आली होती. या हल्ल्यात 55 जवान शहीद झाले होते.