शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! पतीच्या अंत्यसंस्कारासाठी तिनं मुलाला ठेवलं गहाण

By admin | Updated: May 16, 2017 09:14 IST

पतीच्या अंत्यसंस्कारासाठी चक्क आपल्या मुलालाच गहाण ठेवावं लागल्याची घटना कधी तुम्ही ऐकली. उत्तर प्रदेशात असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. 16 - शिक्षण, वैद्यकीय उपचार किंवा एखाद्या लग्नकार्यासाठी आपण आपली बहुमूल्य वस्तू गहाण ठेऊन त्या-त्या वेळच्या आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण पतीच्या अंत्यसंस्कारासाठी चक्क आपल्या मुलालाच गहाण ठेवावं लागल्याची घटना कधी तुम्ही ऐकली. उत्तर प्रदेशात असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 
 
उत्तर प्रदेशातील ताज नगरी येथे नागालँडमधील एक महिला आपल्या मुलासहीत रस्त्यावर उद्धवस्त अवस्थेत फिरताना दिसली. ही महिला नागालँडमधील दीमापूर येथील रहिवासी होती व ती आग्रा येथे आर्थिक उत्पन्नासाठी आली होती. कारण त्या उत्पन्नाद्वारे आपल्या गहाण ठेवलेल्या एका मुलाची सुटका होईल अशी तिला अपेक्षा होती. मात्र परिस्थितीला ते मान्य नव्हते.
 
काय आहे नेमकी घटना?
महिलाच्या पतीचे 7 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. त्यावेळी महिलेकडे पतीच्या अंत्यसंस्कारासाठी पुरेसे पैसे नव्हते. पतीचे अंत्यसंस्कार करण्यात यावेत यासाठी तिनं महाजन नामक व्यक्तीकडून 2000 रुपये उधार स्वरुपात घेतले. या उधारीच्या बदल्यात तिला दोन मुलांपैकी 7 वर्षांच्या एका मुलाला महाजनकडे गहाण म्हणून ठेवण्याचा मनाविरुद्ध सौदा करावा लागला. महाजनकडून मुलाची सुटका करावी यासाठी मदतीच्या अपेक्षेनं तिनं नातेवाईकांकडे धाव घेतली. यावेळी महिलेला ताजनगरीमध्ये नोकरी तर मिळाली नाही, मात्र तिला स्वतःसहीत दुस-या मुलासाठी दोन वेळेचे अन्न मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
 
महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, महाजननं सिक्युरिटी डिपॉझिट स्वरुपात मुलाला त्याच्याकडे ठेवले होते. मुलाची सुटका करण्यासाठी तिनं नागालँड येथे चहाच्या मळ्यात काम करणं सुरू केले, जेथे तिला 40 रुपये प्रतिदिवस असे उत्पन्न मिळत होते. मात्र याद्वारे मुलांची सुटका करणं सोपी बाब नाही, हे तिला ठाऊक होतं. 
 
मुलाच्या सुटकेसाठी महिलेचा संघर्ष
त्यानंतर महिलेनं ही समस्या आपल्या नातेवाईकासमोर मांडली. नातेवाईकाने महिलेला नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. पण तिची परिस्थिती पाहून या नातेवाईकानं पळ काढला. त्यातच आग्रामध्ये पोहोचलेल्या या महिलेजवळ ना खाण्यासाठी पैसे होते ना राहण्यासाठी सोय होती. आपल्या मुलांसहीत तिला रस्त्यावर राहण्याची वेळ ओढावली होती.  अशाच वेळी एकदा नाल्यातील पाणी मुलाला पाजत असताना परिसरातील एका दुकानदारानं पाहिले. हे पाहून त्या दुकानदाराला धक्काच बसला. त्या महिलेची दया आल्यानं त्यानं महिला व तिच्या मुलासाठी पाण्याची बाटली विकत घेतली.  महाजननं मुलाची भेट घेण्यावर बंदी आणल्यानं नैराश्यग्रस्त झालेल्या या महिलेनं मुलाचे नाव स्वतःच्या हातावर लिहिल्याचे त्यानं पाहिले. 
 
याचदरम्यान, एका सामजिक कार्यकर्त्यानं संबंधित महिलेची परिस्थिती पाहून तिच्यासोबत संवाद साधला व याबाबतची माहिती एका सामाजिक संस्था आणि पोलिसांना दिली. महिलेची हलाखीची परिस्थिती पाहून परिसरातील दुकानदारांनी तिला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. या दुकानदारांनी तिला 3500 रुपयांची मदत केली, जेणेकरुन ती आपल्या मुलाची महाजनच्या तावडीतून सुटका करुन स्वतःच्या घरी सुखरूप जाऊ शकेल.