शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! प्रत्येक वर्षी 100 हून अधिक जवान करतायेत आत्महत्या

By admin | Updated: March 11, 2017 08:59 IST

देशात प्रत्येक वर्षी 100 हून अधिक जवान आत्महत्या करत आहेत, अशी धक्कादायक आणि तितकीच गंभीर माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11 - देशात प्रत्येक वर्षी 100 हून अधिक जवान आत्महत्या करत आहेत, अशी धक्कादायक आणि तितकीच गंभीर माहिती समोर आली आहे. 2016 मध्ये विविध परिस्थितींच्या पार्श्वभूमीवर 125 जवानांनी आत्महत्या करत स्वतःचे आयुष्य संपवले आहे. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिली आहे.  
 
'101 सैनिक, 19 एअरमन आणि 5  खलाशांनी गेल्या वर्षी आत्महत्या केली', अशी माहिती सुभाष भामरे यांनी लोकसभेत दिली. याव्यतिरिक्त जवानांच्या हत्येच्या तीन गंभीर घटनाही समोर आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जानेवारी 2017 पासून ते आतापर्यंत 13 जवानांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुर्गम भागात देशाच्या सेवेसाठी तत्पर असलेले सैनिक तणावाखाली येऊन आत्महत्या करत असल्याचे म्हटले जात आहे. 
 
भामरे यांनी सांगितले की,  सरकारकडून या समस्यांवर उपाय काढण्याच्या दिशेने अनेक पाऊले उचलण्यात आली आहेत.  यात उपजीविकेची स्थिती, चांगले राहणीमान आणि नातेवाईकांसाठी चांगल्या सुविधा याचाही उपाययोजनेत समावेश आहे. शिवाय, ताण कमी करण्यासाठी जवानांसाठी योग आणि मेडिटेशन कार्यक्रमांचीही सुरुवात करण्यात आली आहे.  या कार्यक्रमांतर्गत जवानांसहीत त्यांच्या कुटुंबीयांचेही समुपदेशन करण्यात येते. 
 
या मोहीमेत मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत घेण्यात येत आहे. एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, आताच्या काळात जवानांचा कुटुंबीयांशी मोबाइल फोनद्वारे थेट संपर्क होत आहे, त्यामुळे अनेकदा जवानांमध्ये तणावात असतात. 
 
(लष्करी तळांची सुरक्षा अद्यापही रामभरोसेच)
दुसरीकडे, भारतातील लष्करी तळांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही संरक्षण मंत्रालयाने तेथील सुरक्षेच्या दृष्टीने काहीच पावले उचलली नसल्याचे निदर्शनास आले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते निवृत्त मेजर जनरल भुवन चंद्र खंडुरी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या संसदेच्या उच्चस्तरीय समितीनेच हा निष्कर्ष काढला आहे. सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवरुन समितीने सादर केलेल्या अहवालात संरक्षण मंत्रालयावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतरही संरक्षण मंत्रालयाकडून महत्त्वाची व आवश्यक अशी कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत, असे समितीने म्हटले आहे. 
 
पंजाबमधील पठाणकोट तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे सात जवान शहीद झाले होते. संसदीय समितीने म्हटले आहे की सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी लेफ्टनंट जनरल फिलीप काम्पोज यांनी मे 2016 मध्येच आपला अहवाल सोपवला होता. मात्र त्यानंरही संरक्षण मंत्रालयाने कोणतीही हालचाल केल्याचे दिसलेले नाही. संसदेत गुरुवारी सादर केलेल्या अहवालात म्हटले की, पठाणकोट आणि उरी हल्ल्यावेळी परिस्थिती जितकी गंभीर होती, तशीच परिस्थिती आजही कायम आहे. लेफ्टनंट जनरल काम्पोज यांचा अहवाल सादर होऊन 6 ते 7 महिने झाले तरी अद्याप ठोस निर्णय किंवा पाऊल उचलण्यात आल्याचे दिसत नाही.