शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

तिकिटासाठी शिवसेनेत शह-काटशह

By admin | Updated: September 23, 2014 00:30 IST

कळवा-मुंब्य्रात आव्हाडांना घेरण्याच्या नादात आता शिवसेनेकडून या मतदारसंघात काँग्रेसमधील इच्छुकाने मुलाखत दिली आहे

ठाणे : कळवा-मुंब्य्रात आव्हाडांना घेरण्याच्या नादात आता शिवसेनेकडून या मतदारसंघात काँग्रेसमधील इच्छुकाने मुलाखत दिली आहे. दुसरीकडे ठाणे शहर मतदारसंघात नरेश म्हस्के आणि रवींद्र फाटक यांच्यात तिकिटावरून दोन गट तयार झाले आहेत. त्यात ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरदेखील आरोपांच्या फैरी झडू लागल्याने या तीन मतदारसंघांत आता शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे.कळवा - मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्यात घरात घेरण्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आले असून त्या दृष्टीने शिवसेनेने व्यूहरचनादेखील आखली आहे. त्यानुसार, मुलाखतीच्या वेळेस राष्ट्रवादीतून शिवसेनेत डेरेदाखल झालेले दशरथ पाटील आणि सुधीर भगत यांनी मुलाखती दिल्या आहेत. विशेष म्हणजे पाटील यांना शिवसेनेत आणण्यासाठी त्यांना सुरुवातीलाच कमिटमेंट दिली गेली होती. परंतु, आता शिवसेनेनेच ही कमिटमेंट तोडण्याचा घाट घातला आहे. वारंवार पक्ष बदलणाऱ्या काँग्रेसचे राजन किणे यांनी येथील जागेसाठी शिवसेनेतून मुलाखत दिल्याने पाटलांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. विशेष म्हणजे यामुळे येथील स्थानिक शिवसैनिक चांगलेच धास्तावले आहेत. परंतु, आता त्याचे परिणाम शिवसेनेला येथे भोगावे लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे आव्हाडांना येथे घेरण्याच्या नादात शिवसेनेत किणे यांच्या निमित्ताने ठिणगी पडल्याचे चित्र आहे.दुसरीकडे ठाणे शहर मतदारसंघातही ९ जण रेसमध्ये असले तरीदेखील तिकीट मिळवण्याची खरी रेस ही सभागृह नेते नरेश म्हस्के आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले रवींद्र फाटक यांच्यात असू शकते. फाटकांना तिकीट दिले तर निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांचा प्रचार न करण्याचे जवळजवळ निश्चित केले आहे. तसेच अशोक वैती, अनंत तरे, गोपाळ लांडगे हेदेखील येथूनतिकीट मिळवण्याच्या रेसमध्ये आहेत. त्यामुळे येथे देखील आता फाटकविरोधी वातावरण निर्माण झाले असून निष्ठावान विरुद्ध फाटक असा काहीसा सामना येथे तिकीट मिळण्यापूर्वीच रंगला आहे. त्यामुळे कोणाच्या पारड्यात तिकीट पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघातही आता प्रताप सरनाईक यांच्या विरोधातील सूर वाढल्याचे चित्र आहे. मुलाखतीसाठी गेलेल्या सरनाईक यांच्यावर आता आरोप केले जात असून राष्ट्रवादी सोडून ते शिवसेनेत जरी डेरेदाखल झाले असले तरी ते आजही एकनिष्ठ नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु, यामागे वेगळेच राजकारण शिजत असल्याचा आरोप सरनाईकांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (प्रतिनिधी)