शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शिवराजसिंह चौहान यांनी उपोषण सोडले

By admin | Updated: June 12, 2017 00:00 IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुसऱ्या दिवशी रविवारी आपले उपोषण सोडले.

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुसऱ्या दिवशी रविवारी आपले उपोषण सोडले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या. राज्यात आधारभूत दरापेक्षा कमी दरात शेतमाल विकणे हा गुन्हा ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांनी चौहान यांना नारळाचे पाणी देऊन उपोषण सोडले. याबाबत बोलताना शिवराजसिंह चौहान म्हणाले की, २००२ मध्ये आलेल्या स्वामीनाथन समितीच्या अहवालाबाबत मी अभ्यास केला. या अहवालाच्या शिफारशीनुसार अनेक निर्णय घेतले. दलालांना बाजूला करण्यासाठी राज्यात सर्व नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रात ‘किसान बाजार’सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे दूध खरेदी करण्यासाठी नवी प्रणाली लागू करण्यात येणार आहे. शेतमालाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी १००० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय त्यांची जमीन संपादीत केली जाणार नाही. आदिवासींना त्यांच्या ताब्यातील काही जमीन देण्यात येईल. मुख्यमंत्र्यांचे उपोषण म्हणजे नाटक असल्याचे काँग्रेसने कालच म्हटले होते. मंदसौर येथील गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही चौहान म्हणाले. मंदसौरच्या काही भागातील संचारबंदी हटविली मंदसौरच्या तीनही पोलीस ठाण्यांतर्गतची संचारबंदी रविवारी हटविण्यात आली. पिपलीमंडी भागातील संचारबंदी मात्र कायम आहे. जिल्हाधिकारी ओ.पी. श्रीवास्तव यांनी सांगितले की, आज परिस्थिती शांत आहे. हिंसाचाराची कोणतीही घटना नाही. योगेंद्र यादव, मेधा पाटकर यांच्यासह ३० जणांना ताब्यात घेतले मध्य प्रदेश पोलिसांनी रविवारी योगेंद्र यादव, मेधा पाटकर आणि स्वामी अग्निवेश यांच्यासह ३० कार्यकर्त्यांना रतलाम जिल्ह्यात ताब्यात घेतले आणि नंतर त्यांची सुटका केली. पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते जात होते.