शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवपाल यादव काढणार नवा पक्ष

By admin | Updated: February 1, 2017 01:33 IST

स्वपक्षीयांकडून सातत्याने हल्ले होत असल्यामुळे नाराज सपा नेते शिवपाल यादव विधानसभा निवडणुकीनंतर नवा पक्ष स्थापन करणार आहेत. शिवपाल हे सपाचे

नवी दिल्ली : स्वपक्षीयांकडून सातत्याने हल्ले होत असल्यामुळे नाराज सपा नेते शिवपाल यादव विधानसभा निवडणुकीनंतर नवा पक्ष स्थापन करणार आहेत. शिवपाल हे सपाचे संस्थापक प्रमुख मुलायमसिंह यादव यांचे बंधू असून, विधानसभा निवडणुकीनंतर ११ मार्च रोजी ते नव्या पक्षाची मुहूर्तमेढ रोवतील. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी पटत नसल्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अखिलेश हे मुलायमसिंह यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. तथापि, मुलायमसिंह अखिलेशच्या सपात सामील होतात की, शिवपाल यांच्या पक्षाची निवड करतात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘नेताजी आणि माझ्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. आज आम्ही जे काही आहोत ते केवळ नेताजींमुळे, असे म्हणणारे लोकच आता त्यांचा अवमान करीत आहेत, असे शिवपाल म्हणाले. तत्पूर्वी, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवपाल यांनी सपाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. सपातील दुफळी सप्टेंबरमध्ये समोर आली होती. एकीकडे मुलायम आणि त्यांचे बंधू शिवपाल, तर दुसरीकडे मुलायम यांचे पुत्र अखिलेश आणि मुलायम यांचे चुलतभाऊ राम गोपाल यादव, असा संघर्ष पेटला होता. दरम्यानच्या काळात समेटाचे अनेक प्रयत्न झाले. मतभेद दूर झाल्याचे सांगितले गेले. तथापि, सर्वकाही आलबेल नव्हते. दोन्ही गट सायकल या निवडणूक चिन्हासाठी आयोगाकडे गेल्यानंतर वाद समेटाच्या पलीकडे गेला असल्याचे स्पष्ट झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क) मुलायमसिंग करणार प्रचार?- निवडणूक आयोगाने अखिलेश यांच्या गटाला सायकल हे निवडणूक चिन्ह दिले. नाराज मुलायम गटाने शांत राहण्याचा पवित्रा घेतला. सर्वांना वाटले बहुधा समेट झाला असावा. मात्र, ही समजूत तात्कालिक ठरली.- अखिलेख यांनी काँग्रेससोबत युतीची घोषणा केल्यानंतर संतप्त मुलायमसिंह यांनी आपण काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले. सपाने काँग्रेसशी युती करण्यास मुलायमसिंह यांचा विरोध आहे. - काँग्रेससोबत युती करणे पक्षासाठी हानिकारक असल्याचे मुलायमसिंह यांचे म्हणणे आहे. काँग्रेसचा प्रचार करणार नाही, असे ते म्हणत असले तरी अखिलेश यांना मात्र वडील सपा-काँग्रेस युतीचा प्रचार करतील, असे वाटते.