शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बाजारवाडीचे शिवकालीन मंदिर

By admin | Updated: December 20, 2015 23:59 IST

नेरे : भोरपासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या रोहिडेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी बाजारवाडी (ता. भोर) येथे शिवकालीन दगडात कोरीव कामात महादेवाचे पुरातन मंदिर असून ते महाराष्ट्रातील पर्यटकांना आकर्षण ठरत आहे.

नेरे : भोरपासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या रोहिडेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी बाजारवाडी (ता. भोर) येथे शिवकालीन दगडात कोरीव कामात महादेवाचे पुरातन मंदिर असून ते महाराष्ट्रातील पर्यटकांना आकर्षण ठरत आहे.
भोर तालुक्याच्या दक्षिणेस असणार्‍या रोहिडागडाच्या पायथ्याशी हे शिवकालीन महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम दगडी चिर्‍यांमध्ये चुनखडी व माती यामध्ये इसवी सन १८६४ मध्ये केलेले असल्याचे याच मंदिरावरील एका दगडी चिर्‍यावरील तारखेवरून बाजारवाडी गावातील अनेक जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. शिवकालीन मंदिराचे बांधकाम माती, चुनखडी व दगडी चिर्‍यांमध्ये केलेले असले, तरी ते जीर्ण अवस्थेत होते. ३० वर्षांपूर्वी बाजारवाडी ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिरावर उगवलेली झाडे, फुलझाडे, माती याची साफसफाई करून दगडी कोरीव बांधकामात सिमेंट वापरून दर्जा भरून जीणार्ेद्धार करण्यात आले. या मंदिराचे दगडी खांब, दगडी दरवाजा, दगडामधील कोरीव काम, मंदिरातील गणेशाची दगडी मूर्ती व महादेवाची पिंड महाराष्ट्रातील पर्यटकांना मोठे आकर्षण ठरत असल्याचे गावातील जाणकार मंडळींकडून सांगण्यात आले.
रोहिडा किल्ल्याकडे जाताना हे महादेवाचे पुरातन मंदिर पर्यटकांना खुणावत असले, तरी पुरातन विभागाने याकडे लक्ष दिल्यास पर्यटकांच्या दृष्टीने ते पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते, असे ग्रामस्थ, पर्यटक यांच्याकडून सूचित करण्यात येत आहे.
फोटो - बाजारवाडी (ता. भोर) येथील पुरातन काळातील दगडी चिर्‍यांमधील महादेवाचे मंदिर.