शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीरोड झाला १५ फुटांनी रूंद व्यापार्‍यांचा आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद : स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यास प्रारंभ; तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी

By admin | Updated: March 6, 2016 22:06 IST

सोबत फोटो-

सोबत फोटो-

जळगाव: महापालिका आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवाजीरोडवरील व्यापार्‍यांनी १०० वर्षांहून अधिक काळापासूनचे शेडचे अतिक्रमण रविवारी स्वत:हून काढण्यास प्रारंभ केला. शहराच्या विकासात आपलेही योगदान असावे या भावनेने हे शेड व ओट्यांचे अतिक्रमण स्वत:हून काढून घेत असल्याचे सांगतानाच आता आयुक्तांनीही शब्द पाळत मोकळ्या झालेल्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी या व्यापार्‍यांनी केली.
सवार्ेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यात प्रमुख ११ रस्त्यांवरील हॉकर्सचे स्थलांतर करण्याची मोहीम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात पाच रस्त्यांवरील हॉकर्सचे स्थलांतर करण्यात आले. तर दुसर्‍या टप्प्यात शिवाजीरोडवरील फळविक्रेते व मसाला विक्रेत्या हॉकर्सचे स्थलांतर हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी फळ विक्रेत्यांना गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर तर अन्य हॉकर्सला न्यू बी.जे. मार्केटलगतच्या मोकळ्या जागेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे.
शिवाजीरोड या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या दुकानांच्या शेडचे तसेच ओटे, पायर्‍यांचे अतिक्रमण होते. दोन्ही बाजुंनी ४० व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. यातील बहुतांश व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. गेल्या आठवड्यात मनपा अतिक्रमण विभाग व नगररचना विभागाने या भागात फिरून किती अतिक्रमण झालेे याच्या सिमा आखुन दिल्या होत्या. दिलेल्या जागेपेक्षा बहुतांश जण १० ते १२ फुट पुढे आल्याचे लक्षात आले होते. यावेळी काही व्यावसायिकांनी मनपा कर्मचार्‍यांशी वादही घातला होता. त्याबाबत मनपा आयुक्तांच्या आदेशावरून नगररचना विभागाच्या अभियंत्यांनी राबविलेल्या प्रमुख रस्त्यांच्या मोजमापाच्या मोहीमेत अतिक्रमीत जागेची मोजणी करून त्यावर चिन्हांकीत करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी भेट देऊन शिवाजी रोडवरील ४० व्यावसायिकांना रविवारपर्यंत अतिक्रमणे काढा अन्यथा सोमवारी बुलडोझर फिरवला जाईल असा इशारा दिला होता.

आवाहनाला प्रतिसाद
मनपा आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भगीरथ पांडुरंग मेडिकलचे संदीप मंडोरा, चैतन्य मेडिकलचे विजय जोशी, तसेच जितेंद्र मुंदडा आदी दुकानदारांनी पुढाकार घेत रविवारी सकाळी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यास प्रारंभ केला. त्यामुळे अन्य दुकानदारांनीही स्वत:हून अतिक्रमण काढण्यास प्रारंभ करीत चांगला पायंडा पाडला.