शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने दिल्ली सोडली वाऱ्यावर!

By admin | Updated: February 1, 2015 02:40 IST

पक्षनेत्यांच्या ‘तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो’ भूमिकेमुळे शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची स्थिती दयनीय झाली आहे.

पक्षनेत्यांचे हात वर : निवडणूक रिंगणातील उमेदवार झाले सैरभैररघुनाथ पांडे - नवी दिल्लीपक्षनेत्यांच्या ‘तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो’ भूमिकेमुळे शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची स्थिती दयनीय झाली आहे. सेनापती आणि सरदारांनीच हात वर केल्याने ‘दिल्ली’ जिंकण्यासाठी मैदानात उतरलेले मावळे सैरभैर झाले आहेत.महाराष्ट्राबाहेर आपला झेंडा फडकविण्यासाठी शिवसेनेने दिल्ली विधानसभा निवडणुकीत १९ जागांवर उमेदवार उभे केले. पण पक्षाच्या पाठबळाअभावी ते सारेच वाऱ्यावर आहेत. पक्षाकडून रसद मिळत नसल्याचे पाहून काही उमेदवारांनी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराशी मांडवली केली आहे, तर काहींनी प्रचार थांबविला आहे. आदित्य ठाकरे यांच्या रोड-शोसाठी विनंती करूनही शिवसेना भवनातून प्रतिसाद नाही, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासमोर शिवसेनेने उमेदवार उभा केला, पण त्या उमेदवाराचा अर्जच बाद झाला! दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी खा. चंद्रकांत खैरे यांच्यावर आहे. पण त्यांच्याशी संपर्कच होत नसल्याची तक्रार आहे. काही उमेदवारांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या भेटीसाठी बंगल्यात गेले, पण तिथे पाणीही कोणी विचारले नाही. पक्षनेत्यांनीच या निवडणुकीत पाठ फिरविल्यामुळे शिवसेनेसाठी ‘दिल्ली अभी बहोत दूर है!’विजयाबाबत साशंक!शिवसेनेची राजकीय स्थिती अत्यंत हलाखीची आहे. आमचा एकही उमेदवार विजयी होणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. पण यानिमित्ताने पक्ष घराघरापर्यंत पोहोचतो, संघटना मजबूत होते म्हणून शिवसेना निवडणुकीत उतरली आहे़-ओमदत्त शर्मा शिवसेना प्रदेशाध्यक्ष, दिल्लीपक्षसंघटनेचा विस्तार करण्यासाठी दिल्ली विधानसभा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांच्या नावाला हिरवा कंदील देऊन लढाईचे बिगुल फुंकले खरे, परंतु ते स्वत: अथवा त्यांचे शिलेदार यापैकी कोणीही दिल्लीकडे फिरकले नाही की, प्रचार साहित्यही मिळाले नाही़