शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपा-

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

महापालिका निवडणुकीत पुन्हा भाजपा-शिवसेनेचा स्वबळाचा नारा?

महापालिका निवडणुकीत पुन्हा भाजपा-शिवसेनेचा स्वबळाचा नारा?
ेसंदीप प्रधान
नागपूर- महापालिकांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना यांच्यात जागावाटपावरून खडाखडी होणार, असे संकेत आतापासून प्राप्त होऊ लागले आहेत. भाजपाला मुंबई, ठाणे महापालिकांसह सर्व महापालिकांत निम्म्या जागा भाजपाला सोडण्याचा आग्रह त्या पक्षाने शिवसेनेकडे धरलेला आहे. त्यामुळे अनेक प्रमुख महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची चिन्हे आहेत.
सर्वात प्रथम २०१५ मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक होणार असून त्यानंतर २०१६ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे ३३ तर भाजपाचे केवळ ९ सदस्य आहेत. १०७ सदस्य संख्या असलेल्या या महापालिकेतील ६० जागा शिवसेनेने तर ४७ जागा भाजपानेे लढवल्या होत्या. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ७५ तर भाजपाचे ३२ सदस्य आहेत. २२७ सदस्यसंख्या असलेल्या या महापालिकेतील १२९ जागा शिवसेना तर ७१ जागा भाजपा लढली होती. रिपाइंला शिवसेनेने २७ जागा सोडल्या होत्या. आता या दोन महापालिकेत जरी भाजपाने निम्म्या जागांची मागणी केली तरी भाजपा-शिवसेनेत संघर्ष सुरु होऊ शकतो. मुंबई महापालिकेत निम्म्या जागा भाजपाने मागितल्या तर त्यांना ४३ जागा वाढवून द्याव्या लागतील. सध्या शिवसेना व भाजपा लढवत असलेल्या जागांमधील अंतर ५८ जागांचे आहे.
शिवसेनेचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करताना महापालिकांमध्ये निम्म्या जागा भाजपाला सोडण्याची हमी देण्याची अट घालण्याचा प्रस्ताव भाजपाने शिवसेनेसमोर ठेवला होता. मात्र महापालिका जागांची चर्चा आता नको, असे सांगत शिवसेनेने त्याला विरोध केला होता. परंतु भाजपाने निम्म्या जागांचा मुद्दा सोडलेला नाही. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सर्व महापालिकांत युती अशक्य असल्याचे केलेले सूतोवाच हे त्याचेच द्योतक मानले जात आहे. राज्यातील २६ महापालिकांमध्ये सध्या भाजपाचे ३१५ सदस्य आहेत.
मुंबईकरिता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त करण्याच्या मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला विरोध करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्पितळातून धाडण्यामागेही महापालिका निवडणुका कळीच्या ठरणार हे पवार यांच्या चाणाक्ष नजरेने हेरल्याचे निदर्शक आहे. नागपूर येथे दोन दिवसांपूर्वी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना महापालिका निवडणुकीकरिता कामाला लागण्याचा आदेश दिला आहे.