शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शशिकलांना तुरुंगवास

By admin | Updated: February 15, 2017 04:02 IST

अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस आणि मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार व्ही. के. शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवास आणि दहा कोटी रुपये दंड

चेन्नई : अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस आणि मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार व्ही. के. शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवास आणि दहा कोटी रुपये दंड अशी शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केल्यामुळे, त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पार धुळीस मिळाले आहे. मुख्यमंत्रिपद तर हुकले आणि आला नशिबी तुरुंगवास, अशी त्यांची स्थिती झाली असून, गोल्डन बे रिसॉर्टमध्ये बसून असलेल्या शशिकला रात्रीपर्यंत पोलिसांना शरण गेल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी कर्नाटक पोलीस बंगळुरूहून चेन्नईला रवाना झाले आहेत. मात्र, त्या आधी ई. के. पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात त्या यशस्वी ठरल्या असून, त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण असेल?, पनीरसेल्वम की पलानीसामी?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी यासंदर्भात कायदेतज्ज्ञ व घटनातज्ज्ञ यांचा सल्ला घेतला आहे. शशिकला यांनी पनीरसेल्वम यांची कोंडी करण्यासाठी त्यांची व १८ नेत्यांची पक्षातून हकालपट्टीही केली. मात्र शशिकला यांना तो अधिकारच नाही आणि पलानीस्वामी यांची निवडही बेकायदा आहे, असे पनीरसेल्वम सांगत आहेत.मुख्यमंत्रीपदी आपलाच समर्थक असायला हवा, अशी शशिकला यांचा प्रयत्न आहे. ई. के. पलानीस्वामी यांनी संध्याकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सरकार स्थापन्याचा मंगळवारी दावा केला. राव यांच्याशी पलानीस्वामी यांची अल्पकाळ भेट झाली तीत त्यांनी त्यांना पाठिंबा असलेल्या आमदारांची यादी सादर केली. यावेळी त्यांच्यासोबत काही ज्येष्ठ नेते व मंत्रीही होते. पनीरसेल्वम यांनीही त्यानंतर राज्यपालांची भेट घेतली आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास आपणावर जबरदस्ती करण्यात आली होती, तो आपणास मागे घ्यायचा आहे, असे नमूद केले. त्याआधी अण्णा द्रमुक पक्षाच्या आमदारांनी आपापसातील मतभेद मिटवून एकत्र यावे, असे आवाहन पनीरसेल्वम यांनी केले. गेल्या आठवड्यात ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानतो. आता सरकार स्थापन होणार याबद्दल मला खात्री आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)नेतेपदी पलानीस्वामी पनीरसेल्वम यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपदी राहू द्यायचे नाही, अशी भूमिका असलेल्या शशिकला यांनी आता एडापडी के. पलानीस्वामी यांची अण्णा द्रमुक आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड करवून घेतली. पनीरसेल्वमचा जोर वाढलाशशिकला मुख्यमंत्री होणार नाही, हे स्पष्ट झाल्यामुळे मुख्यमंत्री पनीरसेल्वम गटात आनंदाचे वातावरण असून, आता आणखी काही आमदार आपल्याकडे येतील, असे मुख्यमंत्र्यांचे समर्थक सांगत आहेत. या आमदारांचे मन वळवण्यासाठी पनीरसेल्वम गटाचे काही नेते आज गोल्डन बे रिसॉर्टकडे निघाले होते, पण पोलिसांनी त्यांना मध्येच अडवून परत पाठवले.