शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

‘शी टीम्स’मुळे महिला अत्याचार झाले कमी

By admin | Updated: October 27, 2016 02:34 IST

हैदराबादमध्ये महिलांवरील अत्याचारात २० टक्क्यांची घट झाली आहे. हे शक्य झाले आहे अर्थातच ‘शी टीम्स’मुळे. येथील पोलिसांतील ‘माणसांनी’ राबविलेली मोहीम

हैदराबाद : हैदराबादमध्ये महिलांवरील अत्याचारात २० टक्क्यांची घट झाली आहे. हे शक्य झाले आहे अर्थातच ‘शी टीम्स’मुळे. येथील पोलिसांतील ‘माणसांनी’ राबविलेली मोहीम आज सर्वांसाठी आदर्श ठरू पाहत आहे. या टीमने शहरावर बारीक नजर ठेवल्यामुळेच हे शक्य झाले आहे. ‘शी टीम्स’ची स्थापना २४ आॅक्टोबर २०१४ मध्ये झाली. या टीममध्ये अधिकाधिक महिलांचाच समावेश आहे. जे लोक महिलांचा छळ करतात त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठीच या टीमची स्थापना करण्यात आली आहे. सप्टेंबरपर्यंत महिलांच्या छळ आणि अश्लील शेरेबाजीचे एकूण १,२९६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जे मागील वर्षाच्या सप्टेंबरपर्यंत १,५२१ होते. तर, २०१४ च्या सप्टेंबरपर्यंत असे १,६०६ गुन्हे दाखल होते. महिलांसाठी हैदराबाद शहर अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने या टीमची स्थापना करण्यात आली. हैदराबाद पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या टीमच्या स्थापनेपासूनच पोलिसांनी मोठी मेहनत केली आहे आणि महिलांसाठी हे शहर सुरक्षित करण्यासाठी सातत्याने हे प्रयत्न करीत राहू. अपर पोलीस आयुक्त स्वाती लकडा यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात घट झाली आहे. महिलांच्या छेडछाडीचे प्रकारही कमी झाले आहेत. कारण, तरुणांमध्ये एक भीती निर्माण झाली आहे. लकडा यांनी सांगितले की, आतापर्यंत शी टीम्सने गस्त घालताना ८०० लोकांना पकडले. (वृत्तसंस्था)अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये शी टीम्सचे अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये असतात आणि ते कॉलेज अथवा अन्य ठिकाणी निगराणी करतात. यात एक पुरुष आणि एक महिला उपनिरीक्षक असते. यांच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी गुप्त कॅमेरेही असतात.