शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सिंहांच्या कळपात तिने दिला बाळाला जन्म

By admin | Updated: July 1, 2017 16:01 IST

लुंसापुर गावात एका महिलेची प्रसुती चक्क सिंहाच्या कळपामध्ये झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

राजकोट, दि. 1- स्त्री गरोदर असताना प्रसुतीचे दिवस जवळ आले की बऱ्याचदा रेल्वे स्टेशनवर, विमानात किंवा क्वचित रेल्वे ट्रेनमध्ये महिलेचे प्रसुती झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. पण सगळ्यानांचा आश्चर्याचा धक्का बसेल अशी घटना राजकोटमध्ये घडली आहे. अमरेलीमधील जाफराबाद तालुक्यातील लुंसापुर गावात एका महिलेची प्रसुती चक्क सिंहाच्या कळपामध्ये झाली आहे.  बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. त्या महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्यावर तिच्या कुटुंबियांनी 108 क्रमांकावर फोन करून अॅम्ब्युलन्स बोलावली होती. नंतर तिला अॅम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेलं जात होतं. त्यावेळी गावापासून 3 किलोमीटर अंतरावर अॅम्ब्युलन्सला सिंहाच्या कळपाने घेरलं. त्या सिंहाच्या कळपात 11-12 सिंह होते. 
 
108 क्रमांकाच्या इमरजन्सी अॅम्ब्युलन्स सेवेच्या अमरेली जिल्हा प्रमुख चेतन गढिया यांनी सांगितलं, आम्ही गाडीला थांबवून त्या सिंहांना हटविण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. कारण सिंहाचा तो कळप तिथून हालायचा तयारीत नव्हता. त्याचवेळी महिलेला प्रसुती वेदनेसह रक्तस्त्राव व्हायला सुरूवात झाली होती. त्यावेळी अॅम्ब्युलन्समधील कर्मचाऱ्यांनी अॅम्ब्युलन्समध्येच प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांशी फोनवरून संपर्क केला आणि डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊन 25 मिनिटांमध्ये त्या महिलेची प्रसुती करण्यात यश मिळवलं.  
महिलेची अॅम्ब्युलन्समध्ये प्रसुती सुरू असताना समोर असलेले सिंह पूर्णवेळ गाडीभोवती फिरत होते. नवजात बाळाला बेबी वॉर्मरमध्ये ठेवल्यानंतर चालकाने अॅम्ब्युलन्स हळूहळू पुढे न्यायला सुरूवात केली. त्यानंतर सिंहसुद्धा रस्त्यावरून बाजूला गेले. काही मिनिटातच ते सिंह रस्त्यापासून लांब गेले. प्रसुती झालेल्या महिलेला आणि बाळाला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 
 
आणखी वाचा  :
 

पोलिसांनी केली महिलेची स्टेशनवर डिलिव्हरी

 
 
 
खरंतर 108 क्रमांकावर इमरजन्सी  सेवा देत असताना याआधीही अॅम्ब्युलन्सा सिंहाच्या कळपाला सामोरं जावं लागलं होतं. अमरेली गावात नेहमीच सिंह दिसत असतात. त्यामुळे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कर्मचाऱ्यांना तसं प्रशिक्षण दिलं जातं. अनेक वेळा रस्ते नीट नसल्याने अॅम्ब्युलन्समधील कर्मचाऱ्यांना चालतसुद्धा जावं लागतं, असं गढिया यांनी सांगितलं आहे.