शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अडवाणी राष्ट्रपती व्हावे यासाठी शत्रुघ्न सिन्हांची जोरदार बॅटींग

By admin | Updated: June 14, 2017 16:48 IST

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जुलै महिन्यात होणार आहे. गेले कित्येक दिवसांपासून या निवडणुकीसंदर्भात दिल्लीत राजकीय खलबतं सुरु आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - राष्ट्रपतीपदाची निवडणूक जुलै महिन्यात होणार आहे. गेले कित्येक दिवसांपासून या निवडणुकीसंदर्भात दिल्लीत राजकीय खलबतं सुरु आहेत. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी लालकृष्ण अडवाणी ते शरद पवार अशी अनेक नावं चर्चेत आली असली तरी सत्ताधारी एनडीए आणि विरोधी बाकांवरील युपीएकडून कोण उमेदवार असणार याबद्दल सस्पेन्स अजून कायम आहे.  
 
दरम्यान, भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशाचे राष्ट्रपती बनवावे यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांनी यासाठी कॅम्पेन सुरू केलं आहे. अडवाणींच्या समर्थनार्थ सिन्हा दोन दिवसांपासून सातत्याने ट्विट करत आहे.      
 
सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रपतीपदासाठी अडवाणी हे पहिला आणि शेवटचा पर्याय असायला हवेत. राष्ट्रपती निवडणुकीसाठी जर आत्ता जनमत चाचणी घेण्यात आली तर अडवाणी इतरांपेक्षा खूप पुढे असतील अशाप्रकारचे अनेक ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहेत. अडवाणींसाठी सिन्हा यांनी सुरू केलेली ही मोहीम केंद्र सरकार गांभीर्याने घेतं का हे याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे. 
 राष्ट्रपती कोण होणार याबाबत संभ्रम कायम-
 रायसीना हिलवर राष्ट्रपती भवनात यंदा कोण पोहोचणार? जुलै महिन्यात होऊ घातलेली निवडणूक एकमताने होणार की सत्ताधारी आणि विरोधक आपापले बळ अजमावण्यासाठी मतदान घडवणार? याबाबत स्थिती अद्याप स्पष्ट नाही. भारताचे १४ वे राष्ट्रपती ऐंशीच्या दशकानंतर प्रथमच अशा स्थितीत निवडले जाणार आहेत की एकूण मतदानाच्या ४0 टक्के हमखास मते सत्ताधारी एनडीएकडे आहेत. साहजिकच राष्ट्रपतीपदावर आपल्या पसंतीचा उमेदवार विराजमान करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि एनडीए विजयाच्या निकट आहेत.
मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे ३३८ खासदार व १३५२ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यांच्या मतमूल्याची बेरीज आजमितीला ५ लाख ३२ हजार 0३६ आहे. तरीही बहुमतासाठी सत्ताधारी आघाडीला आणखी १७ हजार ४0४ मतांची आवश्यकता आहेच.
एनडीएच्या साऱ्या मतदारांना एकत्र ठेवून आणखी एकदोन गैर काँग्रेस पक्षांना आपल्याकडे ओढण्यात मोदी यशस्वी ठरले तर राष्ट्रपतीपदावर आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून आणण्यात त्यांना फारसा त्रास होणार नाही. तथापि एनडीएतील शिवसेना, अकाली दल, तेलुगु देशम यासारख्या पक्षांनी ऐनवेळी वेगळी भूमिका घेतली तर सध्याच्या गणितात बराच फरक पडू शकतो.
... तर सर्वसंमतीने होऊ शकते निवड
 
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण यावरही हा खेळ बऱ्यापैकी अवलंबून आहे. एखादे असे नाव अचानक पुढे आले तर दोन्ही आघाड्यातील अंतर्विरोधही स्पष्टपणे सामोरे येतील आणि सारी समीकरणेही बदलू शकतील.
 
ज्या नावाला विरोध करणे बहुतांश विरोधकांना अशक्य होईल, असे नाव पुढे करण्यात जर एनडीएने पुढाकार घेतला तर सर्वसंमतीने राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडू शकते. वाजपेयींच्या काळात असे घडले आहे.
 
डॉ. अब्दुल कलाम यांची निवड बिनविरोध झाली नसली तरी डावे पक्ष वगळता, देशातील सर्व राजकीय पक्षांनी कलाम यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता.
 
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यंदा संसदेच्या दोन्ही सभागृहांत ७७६ खासदार व सर्व राज्यांतील मिळून ४१२0 आमदार मतदान करणार आहेत.
 
आमदार, खासदारांचे मिळून मतदानाचे जे निर्वाचक मंडळ (इलेक्टोरल कॉलेज) तयार करण्यात आले आहे, त्याचे एकूण मतमूल्य १0,९८,८८२ इतके आहे.
 
देशातील सर्व आमदारांच्या मतमूल्याची बेरीज ५ लाख ४९ हजार ४७४ इतकी आहे. तर ७७६ खासदारांच्या मतमूल्याची बेरीज ५ लाख ४९ हजार ४0८ आहे.
 
राष्ट्रपतीपदावर निवडून येण्यासाठी यापैकी किमान ५ लाख ४९ हजार ४४१ मतांची आवश्यकता आहे.