शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शत्रुघ्न सिन्हांनी केले काँग्रेस नेत्यांचे कौतुक; राहुल, चिदम्बरम, सुरजेवाला यांचीही स्तुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:17 IST

शत्रुघ्न सिन्हा हे भाजपचे खासदार असले तरी त्यांनी केलेल्या ताज्या टिट्वमुळे ते मुरलेले काँग्रेसजन आहेत, असेच वाटू लागले आहे. सिन्हा यांनी टिट्वमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे राहुल गांधी यांचा उदय हा भव्य असून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला कोणत्याही परिस्थितीला हाताळू शकणारे तर आनंद शर्मा हे मित्र आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे बुद्धीमान आहेत अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे.

नवी दिल्ली : शत्रुघ्न सिन्हा हे भाजपचे खासदार असले तरी त्यांनी केलेल्या ताज्या टिट्वमुळे ते मुरलेले काँग्रेसजन आहेत, असेच वाटू लागले आहे. सिन्हा यांनी टिट्वमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे राहुल गांधी यांचा उदय हा भव्य असून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला कोणत्याही परिस्थितीला हाताळू शकणारे तर आनंद शर्मा हे मित्र आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे बुद्धीमान आहेत अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे.नवज्योत सिंग सिद्धू हे आश्चर्यकारक असे लोकनेते आहेत, असे सिन्हा म्हणाले. राहुल गांधी यांनी दिल्लीत रविवारी काँग्रेसच्या झालेल्या खुल्या अधिवेशनात केलेले भाषण हे ‘जबरदस्त’ होते, असे सिन्हा यांनी म्हटले आहे. गांधी यांनी त्या भाषणात भाजपचे वर्णन सत्तेसाठी भुकेला रावण असे केले होते. गरीब, कंगाल शेतकऱ्यांच्या नशिबी नरेंद्र मोदी यांच्या भ्रामक अशा अच्छे दिन आणि स्वच्छ भारताच्या ‘मायावी’ जगात राहण्याची वेळ आली आहे, असे गांधी म्हणाले होते. रविवारीही सिन्हा यांनी काँग्रेसच्या खुल्या अधिवेशनानंतर दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी शक्तिचे प्रभावी दर्शन घडवले असून ते भारतासाठी चांगले आहे, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या होत्या.गोरखपूर व फुलपूरमध्ये भाजपचा पराभव झाला. सिन्हा यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना लोकमताचा अदमास घेण्यात अपयश आल्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांची याआधीच थट्टा केली होती.मोदींवर मात्र टीकाचराहुल गांधी यांच्या उदयाचे श्रेय शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व इतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना दिले. पाटण्याचे असणारे खासदार शत्रुघ्न सिन्हा हे पक्षात या ना त्या निमित्ताने नाराजी व पक्षविरोधी भावना बोलून दाखवत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्य कारभाराच्या व निर्णय घेण्याच्या पद्धतीवर वारंवार हल्ले केले आहेत.

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा