शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
3
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
4
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
5
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
6
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
7
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
8
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
9
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
10
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
11
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
12
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
14
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
15
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
16
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
17
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
18
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
19
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
20
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."

शास्त्रीजींचे नव्हते संघाशी वैर, सल्ल्यासाठी गोळवलकर गुरूजींना बोलवत : लालकृष्ण अडवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:48 IST

जवाहरलाल नेहरू यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी शत्रुत्वाची भावना होती; पण लालबहादूर शास्त्री यांनी तसे कधी केले नाही. पंतप्रधान असताना ते तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना सल्ल्यासाठी बोलावत असत, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी म्हटले आहे.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी शत्रुत्वाची भावना होती; पण लालबहादूर शास्त्री यांनी तसेकधी केले नाही. पंतप्रधान असताना ते तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना सल्ल्यासाठी बोलावत असत, असे भाजपाचेज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी म्हटले आहे.संघाचे मुखपत्र आॅर्गनायझरच्या ७०व्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित विशेषांकात अडवाणी यांनी शास्त्रींवर लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शास्त्री हे ध्येयनिष्ठ काँग्रेस कार्यकर्ते होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असे गुण होते की, त्यामुळे त्यांची देशभर वाहवाझाली. नेहरूंप्रमाणे त्यांनी जनसंघ वा संघाशी कधीही वैचारिक शत्रुत्व बाळगले नाही.चित्रपट समीक्षणे लिहायचो-अडवाणी १९६० साली आॅर्गनायझरमध्ये सहायक संपादक म्हणून रुजू झाले. या साप्ताहिकाचे प्रतिनिधी म्हणून ते शास्त्रीजींना काही वेळा भेटले होते. विशाल हृदयाच्या लालबहादूर शास्त्रींचे दर्शन मला या भेटींमध्ये झाले, असे नमूद करून अडवाणी यांनी या लेखात म्हटले आहे की, पत्रकार म्हणून काम करताना मला पोशाखातही काही बदल करावा लागला.संघाचा स्वयंसेवक म्हणून सदरा, धोतर असा पोशाख असे; पण हा पोशाख नेत्याला शोभून दिसतो, पत्रकाराला नाही, असे सहकाºयांनी सांगितल्यावर मी पँट घालू लागलो.राजकीय घडामोडींमध्ये रस असूनही मी आॅर्गनायझरसाठी चित्रपटांची समीक्षणे लिहित असे. चित्रपट माझा अत्यंत आवडीचा विषय होता.शास्त्रींचा ‘लोकनेता’ म्हणून भागवतांनीही केला होता गौरव-भारताचे पंतप्रधानपद भूषविलेले लालबहादूर शास्त्री यांचा उल्लेख सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेल्या वर्षी ‘लोकनेता’ असा केला होता. अलाहाबाद येथे लालबहादूर शास्त्री व त्यांच्या पत्नीच्या पुतळ््याचे अनावरण मोहन भागवत यांच्या हस्ते झाले होते.

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ