शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शशिकला गुपचूप बाहेरही गेल्या होत्या? सीसीटीव्हीमधून झाले स्पष्ट, चौकशी सुरूच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 08:44 IST

अण्णा द्रमुकच्या आतापर्यंत तरी सरचिटणीस असलेल्या शशिकला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बंगळुरूच्या तुरुंगात असल्या तरी त्या बाहेरून तुरुंगात शिरत आहेत, असे सीसीटीव्ही फुटेज तपासात सापडले आहे.

बंगळुरू : अण्णा द्रमुकच्या आतापर्यंत तरी सरचिटणीस असलेल्या शशिकला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बंगळुरूच्या तुरुंगात असल्या तरी त्या बाहेरून तुरुंगात शिरत आहेत, असे सीसीटीव्ही फुटेज तपासात सापडले आहे. तुरुंगात असलेल्या शशिकला तुरुंगातून कोणाच्या आशीर्वादामुळे बाहेर पडल्या, याची चर्चा आता सुरू झाली आहे.शशिकला यांना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, अशी तक्रार तुरुंगातील वरिष्ठ अधिकारी डी. रूपा यांनी मध्यंतरी केली होती. त्या वेळी त्यांनी आपल्या वरिष्ठांची नावे घेतली होती आणि त्यापैकी अधिकाºयांनी त्यासाठी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही डी. रूपा यांनी केला होता. त्यानंतर डी. रूपा व त्यांचे वरिष्ठ यांची बदली करून, कर्नाटक सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या चौकशीमध्येच शशिकला या साध्या वेशात बाहेरून तुरुंगात शिरत आहेत, असे सीसीटीव्ही फुटेज सापडले.त्यामुळे त्यांना बाहेर जाण्याची परवानगी कशी मिळाली, ती कोणी दिली, त्या बाहेर का व कुठे गेल्या होत्या, या साºया बाबींची चौकशीही सुरू झाली आहे. तुरुंगातील वरिष्ठांच्या कृपादृष्टीशिवाय कैद्याला बाहेर पडणे शक्यच नाही. तसेच शशिकला यांच्याबाबतीत घडले असावे. मात्र त्यासाठी आर्थिक व्यवहार झाला असावा, असे दिसते. त्या बाहेरून तुरुंगात शिरत असताना, प्रवेशद्वारापाशी अनेक सुरक्षारक्षकही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. शशिकला अगदी सहजपणे आत शिरताना दिसत आहेत. (वृत्तसंस्था)आरोप खरेचत्यांना तुरुंगातही सर्व सुविधा मिळत असल्याचा आरोप डी. रूपा यांनी केला होता. त्यात त्यांनी महासंचालक सत्यनारायण राव यांचे नावच घेतले होते. शिवाय या प्रकरणात दोन कोटी रुपये संबंधितांना देण्यात आल्याचे डी. रूपा यांनी म्हटले होते. ते सारे खरे असल्याचे आता चौकशीतून जाणवू लागले आहे. याच तुरुंगात स्टॅम्प घोटाळ्यातील अब्दुल करीम तेलगी यालाही खास वागणूक मिळते आणि एका तपासणीत तेथील १८ कैद्यांनी अमली पदार्थ घेतल्याचे सिद्ध झाले होते, असेही डी. रूपा यांनी महासंचालक व तुरुंग महानिरीक्षक यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.