शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तीन मराठी कामगारांना ‘श्रमभूषण’ पुरस्कार

By admin | Updated: January 25, 2017 01:03 IST

केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सन २०१५ साठीचे पंतप्रधानांचे ‘श्रमभूषण’ पुरस्कार एका महिलेसह चार कामगारांना मंगळवारी जाहीर केले.

हरिश गुप्ता / नवी दिल्लीकेंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सन २०१५ साठीचे पंतप्रधानांचे ‘श्रमभूषण’ पुरस्कार एका महिलेसह चार कामगारांना मंगळवारी जाहीर केले. यापैकी तीन कामगार/कर्मचारी मराठी आहेत.एम. रामकृष्णन (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स -भेल), श्रीमती अभिलाशा पेठे ( स्टील अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया- सेल), श्यामसुंदर गंगाराम पाडेकर (लार्सन अ‍ॅण्ड ट्युब्रो, मुंबई) आणि रतनकुमार शामराव कांबळे (बजाज आॅटो, औरंगाबाद) यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. एक लाख रुपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. केंद्र व राज्य सरकारांचे सार्वजनिक उपक्रम आणि ५०० हून अधिक कर्मचारी असलेले खासगी कारखाने यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमधून दरवर्षी ‘श्रमरत्न’, ‘श्रमभूषण’, ‘श्रमवीर /श्रम विरांगना’ आणि ‘ श्रमश्री/ श्रमदेवी’ अशा विविध वर्गा तील पुरस्कारांचे विजेते निवडले जातात. सन २०१५ साठी ‘श्रमरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार कोणालाही जाहीर झालेला नाही. चौघांना ‘श्रमभूषण’, २४ जणांना श्रमवीर /श्रम विरांगना’ व २८ जणांना ‘श्रमश्री/ श्रमदेवी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.