शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदासाठी डाव्यांची मोर्चेबांधणी

By admin | Updated: April 23, 2017 19:21 IST

राजकारणातले चाणक्य समजले जाणारे शरद पवारांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतीपदासाठी अनेक नावांची चर्चा असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राजकारणातले चाणक्य समजले जाणारे शरद पवारांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. भाजपाच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्ष ताकदवान उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळे साहजिकच शरद पवारांच्या नावाला पुन्हा एकदा राजकीय ताकद मिळाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी डाव्या पक्षांनी पवारांना सर्वाधिक पसंती दिली आहे.राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांकडून पहिल्यांदा संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता त्यांचं नाव अचानक मागं पडलं असून, शरद पवारांचं नाव आघाडीवर आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात आणि सीताराम येच्युरी यांनी शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी पवारांची भेटही घेतली आहे. ते म्हणाले, "शरद पवार हे विश्वासार्ह नेते असून, त्यांच्याकडे मते ओढून आणण्याची क्षमता आहे. पवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरल्यास ते एनडीएची मतंही सहजरीत्या फोडू शकतील. मराठी माणूस म्हणून शिवसेनाही त्यांना मतदान करू शकते. डाव्यांचा असा समज असल्यामुळेच पवारांचं नाव सध्या आघाडीवर आहे.