शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नाहीत - राष्ट्रवादी

By admin | Updated: April 18, 2017 23:02 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचं राष्ट्रवादीनेच स्पष्ट केलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 18 - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचं राष्ट्रवादीनेच स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. शरद पवार हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील का, या प्रश्नावर पत्रकारांनी त्रिपाठींना छेडले असता, त्रिपाठींनी पवार स्पर्धेत नसल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, शरद पवार हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि नेते आहेत. त्यांनी या पदासाठी शर्यतीत राहण्याचा प्रश्नच नाही. काही इतर पक्षाचे नेते ही निवडणूक लढवणार आहेत. मात्र शरद पवार अजिबात नाही, असं उत्तर डी. पी.  त्रिपाठी यांनी पत्रकारांना दिलं आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवारांना पद्मविभूषण या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्याच दरम्यान शरद पवारांचं नाव राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. या जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असून, भाजपाकडून लालकृष्ण आडवाणींच्या नावाची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेनं मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित करावं, अशी मागणी केली होती. त्यानंतर भागवतांनी स्वतः ही मागणी गांभीर्याने न घेण्याचं आवाहन करत फेटाळून लावली होती. एनडीएच्या बैठकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी राष्ट्रपतीपदाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभेतले 543 खासदार, राज्यसभेचे 233 खासदार मतदान करतात. असे एकूण मिळून 776 खासदारांची मते ग्राह्य धरली जातात. तर दुसरीकडे भारतातल्या राज्यांमधील विधानसभेचे आणि विधान परिषदेचे असे एकूण मिळून 4120 आमदारही मतदान करतात.