शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शंकर महादेवन यांच्या हस्ते उद्या संगीत विद्यालयाचे उद्घाटन

By admin | Updated: July 10, 2015 00:27 IST

नाशिक : रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खास अंधांसाठी संगीत विद्यालय आणि कॉम्प्युटर सेंटरचे उद्घाटन शनिवारी (दि.११) आघाडीचे संगीतकार आणि पार्श्वगायक शंकर महादेवन यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती द ब्लाइन्ड वेल्फेअर ऑर्गनायझेशनद्वारा आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

नाशिक : रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खास अंधांसाठी संगीत विद्यालय आणि कॉम्प्युटर सेंटरचे उद्घाटन शनिवारी (दि.११) आघाडीचे संगीतकार आणि पार्श्वगायक शंकर महादेवन यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती द ब्लाइन्ड वेल्फेअर ऑर्गनायझेशनद्वारा आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात दुपारी ४ वाजता संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन होणार असून, या संगीत विद्यालयात प्राथमिक स्तरापासून ते अलंकार विशारदेपर्यंत अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने संगीताचे धडे गिरवता येणार आहे, तसेच या विद्यालयात शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, सर्व प्रकारची चर्म वाद्ये, व्हायोलिन, मेंडोलिन यांसारखी दुर्मिळ वाद्येही शिकवली जाणार आहेत.द ब्लाइन्ड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या अंधांसाठी काम करणार्‍या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, स्वयंरोजगारासाठी वस्तू उपलब्ध करून देणे, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, अंध व्यक्तींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, अंधांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करणे आदि योजना राबविण्यात येतात.दुपारी संगीत विद्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर रात्री ९.३० वाजता कालिदास कलामंदिर येथे शंकर महादेवन यांचा सुश्राव्य गीतांचा कार्यक्रम आयोजित केला असून, या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीतून प्राप्त होणारा निधी संगीत विद्यालय आणि कॉम्प्युटर सेंटरच्या उभारणीसाठी वापरला जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, खास लोकमत सखी मंच सदस्य आणि प्रिव्हिलेज कार्डधारकांना ५०० रुपयांचे तिकीट ४२५ रुपयांना, तर ३०० रुपयांचे तिकीट २२५ रुपयांना वितरित करण्यात येणार आहे.या पत्रकार परिषदेस द ब्लाइन्ड वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर, सचिव दत्ता पाटील, कोषाध्यक्ष विजया डबे, मानद अध्यक्ष कल्पना पांडे, डॉ. विजय घाडगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.-- सदरची बातमी श्री अग्रवालसोा यांना दाखवणे...