शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पलाणीस्वामींची उद्या शक्तिपरीक्षा

By admin | Updated: February 17, 2017 03:37 IST

अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशीकला यांचे निष्ठावंत ई. के. पलाणीस्वामी (६३) यांना अखेर राज्यपाल विद्यासागर राव यांनी

चेन्नई : अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशीकला यांचे निष्ठावंत ई. के. पलाणीस्वामी (६३) यांना अखेर राज्यपाल विद्यासागर राव यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. ते करतानाच त्यांना १५ दिवसांत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास राज्यपालांनी सांगितले. मात्र, ते १८ फेब्रुवारी रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवणार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी शशीकला यांच्याविरोधात बंड केल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम मिळाला. त्यांच्या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलाणीस्वामी यांचे फोन करून अभिनंदन केले. द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनीही नव्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आणि राज्यात स्थिर सरकार राहावे, अशी आशा व्यक्त केली. पलाणीस्वामी यांनी राज्यपाल राव यांच्याकडे आपणास १२४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करीत, त्यांची यादी बुधवारी रात्री सादर केली होती. त्यानंतर, पनीरसेल्वमही राज्यपालांना भेटले. मात्र, त्या वेळी त्यांना १0 आमदारांचाच पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राव यांनी त्यांना पलाणीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यास गुरुवारी निमंत्रित केले. विधानसभेचे सदस्य २३४ आहे. (वृत्तसंस्था)पलाणीस्वामी यांचे मंत्रिमंडळ ३१ जणांचे आहे. गेल्या नऊ महिन्यांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे पलाणीस्वामी हे अण्णा द्रमुकचे तिसरे नेते आहेत. जयललिता यांनी मे २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश प्राप्त केले. त्या ७४ दिवस रुग्णालयात असेपर्यंत मुख्यमंत्री होत्या. त्यांचे ५ डिसेंबर रोजी जयललिता यांचे निधन झाले आणि पनीरसेल्वम मुख्यमंत्रीपद झाले. जयललिता भ्रष्टाचाराच्या खटल्यात तुरुंगात गेल्या तेव्हाही त्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले होते.पनीरसेल्वमचा संघर्षाचा पवित्रा कायम ओ. पनीरसेल्वम यांनी जे. जयललिता यांची राजवट स्थापन होईपर्यंत शशीकला व त्यांच्या कुटुंबीयांविरोधातील माझा लढा सुरूच राहील, असे गुरुवारी सायंकाळी म्हटले. एका कुटुंबाच्या हाती पक्ष व सरकार पुन्हा जाण्यापासून रोखण्यासाठी आपण सगळे एक होऊ या. लोकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारे सरकार पुन्हा एकदा आपल्याला स्थापन करायचे आहे आणि ते होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असे ते म्हणाले.