शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख राहतो भारतात, ‘हृदय’ मात्र पाकिस्तानात!

By admin | Updated: November 4, 2015 09:28 IST

अभिनेता शाहरुख खान हा भारतात राहत असला तरी त्याचे ‘हृदय’ मात्र पाकिस्तानात आहे, अशा शब्दांत भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी मंगळवारी शाहरुखवर टीका केली.

नवी दिल्ली : अभिनेता शाहरुख खान हा भारतात राहत असला तरी त्याचे ‘हृदय’ मात्र पाकिस्तानात आहे, अशा शब्दांत भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी मंगळवारी शाहरुखवर टीका केली. तर, केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी विजयवर्गीय यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. देशात मोठ्या प्रमाणात असहिष्णुता वाढली आहे, असे शाहरुखने सोमवारी म्हटले होते. त्यावर तीव्र प्रतिक्रिया देताना, शाहरुख हा ‘राष्ट्रविरोधी’ असल्याचे विजयवर्गीय म्हणाले. वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला भाजपाने आपल्या नेत्यांना दिला होता. त्याकडे दुर्लक्ष करीत विजयवर्गीय यांनी शाहरुखबाबत हे वादग्रस्त टिष्ट्वट केले. ते म्हणाले, ‘शाहरुखचे चित्रपट येथे कोट्यवधी रुपये कमावतात, तरीही भारत असहिष्णू आहे असे त्याला वाटते. हे राष्ट्रविरोधी नाही तर मग दुसरे काय आहे? भारत संयुक्त राष्ट्राचा स्थायी सदस्य बनण्याचा प्रयत्न करीत आहे आणि पाकिस्तानसह सर्व भारतविरोधी शक्ती कटकारस्थान रचत आहेत. असहिष्णुतेबद्दलचे शाहरुखचे वक्तव्य हे पाकिस्तान आणि भारतविरोधी शक्तींच्याच सुरात सूर मिसळणारे आहे.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)