शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख खानच्या ‘फॅन’चा गर्दीत मृत्यू

By admin | Updated: January 25, 2017 00:57 IST

: अभिनेता शाहरूख खान याला बघण्यासाठी सोमवारी उसळलेल्या गर्दीत एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश

वडोदरा/नवी दिल्ली : अभिनेता शाहरूख खान याला बघण्यासाठी सोमवारी उसळलेल्या गर्दीत एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.‘रईस’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या शाहरूख खान हा त्याच्या जाहिरातीसाठी वडोदरा रेल्वेस्टेशनवर रेल्वेने सोमवारी रात्री आला होता. त्याला बघण्यासाठी चाहत्यांची स्टेशनवर प्रचंड गर्दी उसळली होती. तीत फरीद खान पठाण (४५) या स्थानिक राजकीय नेत्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. प्रभू यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस महासंचालकांना घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यास सांगितले असल्याची माहिती मंगळवारी टिष्ट्वटरद्वारे दिली. फरीद खान पठाण यांचा मृत्यू हा दुर्दैवी असल्याचे शाहरूख खान याने म्हटले. मुंबई-दिल्ली आॅगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसने वडोदरा रेल्वेस्थानकावर शाहरूख खान सोमवारी रात्री १०.३० वाजता दाखल झाला. त्याला पाहण्यासाठी सुमारे १५ हजार चाहत्यांची गर्दी उसळली होती व ती बेभान बनली. त्या गोंधळात खान यांचा मृत्यू झाला. गुजरात रेल्वे पोलीसही या घटनेची चौकशी करीत आहेत. शाहरूख खान याच्यासोबत प्रवास करीत असलेल्या पत्रकाराचे फरीद पठाण हे नातेवाईक होते व त्याला भेटण्यासाठी ते आले होते. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे दोन पोलीसही जखमी झाले. रेल्वे स्थानकात थांबताच काही चाहत्यांनी खिडक्यांच्या तावदानांवर जोरजोराने तडाखे द्यायला सुरुवात केली. त्या वेळी पोलिसांना त्यांना आवरण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. फरीद पठाण यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. धावत्या रेल्वेमागे जमाव पळत असताना पोलिसांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला तेव्हा फरीद खान पठाण बेशुद्ध पडले व नंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. पश्चिम रेल्वेचे पोलीस अधीक्षक (वडोदरा विभाग) शरद सिंघल म्हणाले की, आयोजकांनी अशा कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेतली होती का याची चौकशी केली जाईल.