शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

गांधींवरील वक्तव्याबद्दल शाह व मोदी यांनी माफी मागावी; काँग्रेसची मागणी

By admin | Updated: June 11, 2017 00:54 IST

महात्मा गांधी हा चतुर बनिया होता, या भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याला काँग्रेसने शनिवारी आक्षेप घेतला. हे वक्तव्य राष्ट्रपित्याचा अपमान करणारे असून

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : महात्मा गांधी हा चतुर बनिया होता, या भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याला काँग्रेसने शनिवारी आक्षेप घेतला. हे वक्तव्य राष्ट्रपित्याचा अपमान करणारे असून, त्याबद्दल शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अमित शाह यांनी गांधीजींचा उल्लेख एकेरी केला होता, त्याचाही काँग्रेसने निषेध केला आहे. ‘जातीयवादाविरुद्ध लढण्याऐवजी ते (भाजपा) राष्ट्रपित्याचीही जात काढतात. यावरून सत्ताधारी पक्ष आणि त्याच्या प्रमुखांचे चरित्र तसेच विचारसरणी लक्षात येते. हे लोक देशाला नेमके कोठे नेणार आहेत,’ असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केला. राष्ट्रपिता व स्वातंत्र्य चळवळीचा अपमान केल्याबद्दल शाह, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश, स्वातंत्र्यसैनिकांची कुटुंबे आणि प्रत्येक नागरिकाची माफी मागायला हवी, असे ते म्हणाले. भाजपाप्रमुख शाह यांनी रायपूर येथे जाहीर सभेला संबोधित करताना शुक्रवारी महात्मा गांधी यांचा ‘बहुत चतुर बनिया’ असा उल्लेख केला. काँग्रेसची कोणतीही विचारसरणी आणि तत्त्वे नाहीत. केवळ स्वातंत्र्य मिळविण्यासाठीचे ते ‘स्पेशल पर्पज व्हेइकल’ होते. त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काँग्रेसचे औचित्य संपले आहे,’ असेही शाह म्हणाले. ‘स्वत: सत्तेचे व्यापारी असलेले अमित शाह आज स्वातंत्र्य चळवळीला बिझनेस मॉडेल म्हणत आहेत; परंतु वस्तुस्थिती ही आहे की, स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी देशाची फाळणी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेचा स्पेशल पर्पज व्हेइकल म्हणून वापर केला होता’. आजही भाजपा मोजक्या उद्योग घराण्यांचे व्यावसायिक हित सांभाळण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेइकल म्हणूनच काम करीत आहे, असा घणाघात सूरजेवाला यांनी केला. सूरजेवाला यांच्या मते शाह यांचे वक्तव्य स्वातंत्र्यसैनिक, त्यांचा त्याग तसेच राष्ट्रपित्याचा अपमान करणारा आहे.