पंबा : आयप्पाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या आंध्र प्रदेशमधून आलेल्या वयाची पन्नाशी ओलांडेलल्या सहा महिलांना निदर्शकांनी शबरीमला डोंगराच्या पायथ्याशीच रविवारी अडविले. सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटांच्या महिलांना या मंदिराचे दरवाजे खुले केल्यानंतरही पन्नाशीच्या आतील महिलांना तथाकथित भक्तांनी सक्तीने रोखण्याचा हा पाचवा दिवस होता.या महिला इतर कुटुंबियांसोबत दर्शनासाठी आल्या होत्या. निदर्शकांनी अडविल्यावर त्यांनी ‘आम्हाला ही प्रथा माहीत नव्हती’, असे सांगून स्वत:च मंदिरात न जाण्याचे मान्य केले, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, भाजपच्या पुढाकाराने विविध हिंदुत्ववादी संघटनांनी रविवारी केरळमधील सर्व पोलीस ठाण्यांच्या समोर निदर्शने करून शबरीमलाच्या प्रथा व परंपरा न पाळण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
शबरीमला : सहा महिलांना अडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 04:29 IST