शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक समानता हाच घटनात्मक संदेश

By admin | Updated: April 19, 2016 04:26 IST

ऐतिहासिक सबरीमाला मंदिरात विशिष्ट वयोगटातील (रजस्वला) महिलांना प्रवेश नाकारण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय योग्य धार्मिक व्यवहार मानता येणार नाही

नवी दिल्ली : ऐतिहासिक सबरीमाला मंदिरात विशिष्ट वयोगटातील (रजस्वला) महिलांना प्रवेश नाकारण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय योग्य धार्मिक व्यवहार मानता येणार नाही. लैंगिक समानता हाच घटनात्मक संदेश असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले आहे.घटनात्मक तरतुदीखाली चालत आलेल्या या कथित परंपरेबद्दल कायदेशीर बाबी तपासणार असल्याचा पुनरुच्चार न्या. दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने केला. व्ही. गोपाल गौडा आणि कुरियन जोसेफ या अन्य न्यायाधीशांचाही या खंडपीठात समावेश आहे. ‘हॅपी टू ब्लीड’ या स्वयंसेवी संघटनेची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग म्हणाल्या की, केरळच्या या ऐतिहासिक मंदिरात महिलांना प्रवेश दिला जावा. लैंगिक भेदभाव करणाऱ्या परंपरा आणि श्रद्धेवर घटनात्मक तत्त्वांनी मात करायला हवी. महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणे योग्य ठरवता येणार नाही. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी त्यांनी विविध निर्णयांचा दाखलाही दिला. सर्व हिंदूंना सार्वजनिक मंदिरांमध्ये प्रवेशाचा अधिकार दिला आहे. घटनात्मक तत्त्वांचे पालन केले जात नसेल तर कोणतीही परंपरा, श्रद्धा किंवा कायदा निरर्थक ठरतो.