शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

TVF सीईओ अरुणाभ कुमारविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा

By admin | Updated: March 30, 2017 09:50 IST

एंटरटेनमेंट चॅनेल ‘द व्हायरल फीवर’ (TVF) चे सीईओ आणि संस्थापक अरुणाभ कुमार यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - एंटरटेनमेंट चॅनेल ‘द व्हायरल फीव्हर’ (TVF) चे सीईओ आणि संस्थापक अरुणाभ कुमार यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलेची ओळख उघड करण्यात आलेली नाही. गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप अरुणाभ कुमार यांनी पोलिसांनी अटक केलेली नाही. 
 
हे प्रकरण 2016 मधील असून पीडित तरुणी मुलाखतीसाठी गेली असता अरुणाभ कुमार यांनी तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र कोणाच्या तक्रारीवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे हे पोलिसांनी उघड केलेलं नाही. 
 
अरुणाभ कुमार यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप होण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्याच महिन्यात TVF ची माजी कर्मचारी असलेल्या महिलेने ब्लॉगच्या माध्यमातून अरुणाभ कुमार यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. 2014 ते 2016 दरम्यान TVF मध्ये काम करत असताना आपला लैंगिक छळ करण्यात आल्याचं तिने पोस्टमध्ये लिहिलं होतं. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. 
 
TVF ने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच खोटं आरोप करणा-या आणि चुकीची माहिती देणा-यांना सोडणार नाही असं म्हटलं आहे. "आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत अरुणाभ यांनी त्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, तसेच याप्रकरणी निष्पक्ष न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे", अशी मागणी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत अरुणाभ यांनी केली होती.
 
तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून लवकरच अरुणाभ कुमार यांना अटक होण्याची शक्यता वाढली आहे.