शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक छळ : तक्रारींचे निराकरण वेळेत करा

By admin | Updated: October 22, 2016 01:07 IST

सरकारी कार्यालयांत महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींचे निराकरण ठराविक कालमर्यादेतआणि संवदेनशीलरित्या मार्गी झाले पाहिजे, अशी भूमिका केंद्रीय महिला

नवी दिल्ली : सरकारी कार्यालयांत महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींचे निराकरण ठराविक कालमर्यादेतआणि संवदेनशीलरित्या मार्गी झाले पाहिजे, अशी भूमिका केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने घेतली आहे. सरकारी कार्यालयांत महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींच्या चौकशीत होत असलेल्या विलंबाच्या तक्रारींची या मंत्रालयाने गांभीर्याने दखल घेतली आहे. आम्ही या तक्रारी ठराविक कालमर्यादेत आणि संवेदनशीलतेने निकाली काढाव्यात असा ‘कठोर’ सल्ला देणार असल्याचे शुक्रवारी मंत्री मनेका गांधी म्हणाल्या. केंद्रीय सरकारी कार्यालयांतील महिलांनी मनेका गांधी यांची भेट घेऊन कार्यालयांतील अंतर्गत चौकशी समित्या चौकशीला नेहमीच विलंब लावतात व तक्रारींचे निराकरण मार्गदर्शक सूचनांनुसार करीत नाहीत, अशा तक्रारी केल्या. कार्यालयांत होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारी कशा पद्धतीने हाताळल्या जातात याचा मी माझ्या पातळीवर आढावा घेईन, असे गांधी म्हणाल्याचे मंत्रालयाने आपल्या टिष्ट्वटरद्वारे सांगितले. वेगवेगळ््या केंद्रीय सरकारी विभागातील अंतर्गत तक्रारी समित्यांच्या प्रमुखांना गांधी यांनी निवडक तक्रारींची सोडवणूक कशी केली हे दाखवा (प्रेझेंटेशन) यासाठी बोलावून घेतले होते. तक्रारींचे निराकरण निश्चित कालावधीत व संवेदनशीलरित्या कसे करावे यासाठी कठोर मार्गदर्शक सूचना देण्यास आम्हाला या सादरीकरणाचा चांगला उपयोग होईल, असे गांधी म्हणाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)मंत्रालय लक्ष घालणार - सरकारी कार्यालयांतील ज्या महिलांच्या तक्रारींचे निराकरण अजून झालेले नाही त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा व कार्यालयात अंतर्गत चौकशी समिती नसेल तर त्याचीही माहिती द्यावी, असे मनेका गांधी यांनी म्हटले. - अशासकीय कार्यालयांतील लैंगिक छळाच्या तक्रारींच्या हाताळणीतही मंत्रालय लक्ष घालणार असल्याचे मनेका गांधी यांनी म्हटले.