शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशन संपले; वाद काही संपेना, रण सुरूच

By admin | Updated: August 14, 2015 00:55 IST

ललित मोदीप्रकरणी सरकारने बचावापोटी केलेला युक्तिवाद धुडकावून लावत, काँगे्रस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ललित मोदीप्रकरणी सरकारने बचावापोटी केलेला युक्तिवाद धुडकावून लावत, काँगे्रस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर जोरदार तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ललित मोदीला भारतात परत आणावे. अन्यथा ते घाबरले, असे म्हणावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी मोदींना लक्ष्य केले. संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आल्यानंतर राहुल यांनी संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करीत काँग्रेसच्या धरण्याचे नेतृत्वही केले. काँगे्रसच्या या धरण्यात तृणमूल काँग्रेसही सहभागी झाली.‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ अशा बाता मारणाऱ्या नरेंद्र मोदींकडे एक चांगली संधी आहे. त्यांनी ललित मोदीला परत आणून क्रिकेटची सफाई करावी. संपूर्ण देश तुम्हाला ही संधी देत आहे. ललित मोदीला परत आणू शकत नसाल, तर तुम्ही घाबरलात, असे आम्हाला समजावे लागेल, असे उपरोधिक ताशेरे राहुल यांनी ओढले. निवडणुकीदरम्यान आपल्यात धमक असल्याचे तुम्ही सांगितले होते. ती धमक दाखविण्याची वेळ आली आहे. सत्ताधारी मंत्र्यांवर आरोप होत असताना, पंतप्रधानांनी संसदेत येऊ नये, हे दुर्दैवी आहे. भूसंपादन विधेयकावर पंतप्रधान घाबरून पळून गेले. (लोकमत न्यूज नेटवर्क)