शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

अधिवेशन-कॉलम

By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST

विधिमंडळ कॉलम

विधिमंडळ कॉलम
.................................
कदमांचा क्रमांक
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना विधानसभेत सातव्या क्रमांकाचे आसन देण्याचा निर्णय यापूर्वी झाला असताना मंगळवारी विधिमंडळ सचिवालयाकडून त्यांना यांना आठव्या क्रमांकाचे आसन देण्याचा फतवा जारी झाल्याने कदम यांचं माथं गरम झालं. गृहनिर्माणाबरोबर तात्पुरते संसदीय कामकाज हे खाते ताब्यात आलेल्या प्रकाश मेहता यांनी मध्येच आपला क्रमांक लावण्याचा प्रयत्न केल्याने कदम यांचा क्रमांक घसरला! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील आणि विधानसभेतील आसनव्यवस्था मंत्र्यांच्या ज्येष्ठतेनुसार ठरते. कोण कुणाच्या अगोदर मंत्री झाले, कोण राज्यमंत्री होता तर कोण कॅबिनेट दर्जाचा मंत्री होता, कुणाची कितवी टर्म सुरु आहे, अशा बाबी क्रमांक निश्चित करताना महत्वाच्या ठरतात. मेहतांचा क्रमांक वरचा लावायचा तर शिवसेनेच्या परिवहनमंत्री दिवाकर रावते किंवा रामदास कदम यांचाच क्रमांक घसरणार आहे. कदम यांचा चढलेला पारा पाहून त्यांचा क्रमांक तोच ठेवायचा तर रावते यांचा सामना विधिमंडळ सचिवालयाला करायला लागणार.(हे म्हणजे इकडे आग तर तिकडे फुफाटा)
...........................................
उदयोन्मुख कलावंत
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या लीलांमुळे मीडियाच्या पडद्यावर स्थान मिळवतात. त्यांच्या उक्ती व कृतीवरून टीका झाली तरी पडदा तेच व्यापतात. त्यामुळे त्यांच्यातील कलाकाराचे गेल्या आठ महिन्यांत महाराष्ट्राला दर्शन झाले होते. मात्र काँग्रेसचे अमिन पटेल हे आपले सुप्त अभिनय कौशल्य गेले पंधरा वर्षे सत्ता असल्याने दाखवू शकले नव्हते. मंगळवारी विधान भवनातील मुख्य प्रवेशद्वारापाशी पथनाट्यात पटेल यांची प्रमुख भूमिका होती. भास्कर जाधव यांना विधानसभेचे अध्यक्ष करण्यात आले (जाधव यांना नाटकातही अध्यक्षपद देण्याची ही सुनील तटकरे यांची खेळी असावी) पटेल हे अध्यक्षांसमोर सत्ताधार्‍यांची भूमिका वठवत होते. त्यानंतर चिक्की खाऊन मृत झालेल्याबद्दल पटेल शोक करीत होते तर तिकडे आव्हाड चिक्की खाऊन आपला टीआरपी घसरू नये याची काळजी वाहत होते. (पंकजा मुंडे यांनी कुटुंबनियोजनाच्या गोळ्यांत भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाले असते तर आव्हाड यांनी काय खाल्ले असते अशी शंका भाजपाच्या एका आमदाराने उपस्थित केली.) नाटक असो की वास्तव काही कायम सत्ताधार्‍यांच्या भूमिकेचे कलावंत असतात तर काही विरोधकांच्या भूमिकेतील. त्याचे प्रत्यंतर आले.
..............................................
पत्रकार उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांच्यात दुहेरी व्यक्तीमत्व असल्याचा गौप्यस्फोट महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केल्याने महाराष्ट्राला धक्का बसणे स्वाभाविक आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पत्रकार उद्धव ठाकरे ही दोन भिन्न व्यक्तीमत्वे असल्याचे खडसे यांचे मत आहे. पत्रकार ठाकरे हे सरकारवर टीका करतात, मंत्र्यांना बोचकारतात. पक्षप्रमुख ठाकरे यांच्याशी भाजपाचे सौहार्दपूर्ण संबंध असल्याची ग्वाही खडसे यांनी दिली. पत्रकाराचे काम टीका करणे हे आहेच. यापूर्वी शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेख ठाकरे लिहित नसल्याने त्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशी भूमिका भाजपा घेत होती. मात्र दररोज टीका होत असल्याने आता उद्धव यांच्यातील पत्रकार ही टीका करीत असल्याचा साक्षात्कार भाजपाला झालाय. (उद्धव हे विधिमंडळाचे वृत्तांकन करण्याकरिता पुढील आठवड्यात येणार असल्याची चर्चा पत्रकार गॅलरीत सुरु झाली आहे.)
संदीप प्रधान