शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांच्या सेवेसाठीच धरणे!

By admin | Updated: April 27, 2016 06:02 IST

हाराष्ट्रातील धरणे शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे तर साखर कारखान्यांची सेवा करण्यासाठी बांधण्यात आली आहेत

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील धरणे शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे तर साखर कारखान्यांची सेवा करण्यासाठी बांधण्यात आली आहेत, असा आरोप करून केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी मंगळवारी लोकसभेत महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीच्या काँग्रेस सरकारांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी राज्यातील दुष्काळावर सभागृहात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून सत्तारूढ पक्ष आणि विरोधकांमध्ये वाक्युद्ध भडकले.संपुआच्या राजवटीचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करताना सिंग म्हणाले, ‘मागील अनेक वर्षांपासून राज्यांना मनरेगा योजनेअंतर्गत उशिरा म्हणजे जुलै-आॅगस्टमध्ये निधी मिळत आला होता. परंतु रालोआ सरकारने अर्थसंकल्प मंजूर झाल्याच्या २४ तासांतच हा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.’ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीवर विचारण्यात आलेल्या आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात कृषिमंत्री सिंग म्हणाले, असे ८० सिंचन प्रकल्प मागील २० वर्षांपासून प्रलंबित आहेत. आता सरकारने त्यापैकी काही प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरविले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)काँग्रेस-भाजपात उडाली चकमकच्महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्याला सरकार दुष्काळी मदत करणार काय, या शिवसेनेच्या सदस्याने प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या पूरक प्रश्नाला कृषिमंत्री सिंग हे उत्तर देत असताना; ही मदत अन्य दुष्काळी जिल्ह्णांनाही मिळणार आहे काय, असा प्रश्न काँग्रेस सदस्यांनी विचारला. मध्येच विचारलेल्या या प्रश्नामुळे सिंग संतप्त झाले आणि काँग्रेस सदस्यांना उद्देशून म्हणाले, ‘माझे उत्तर ऐकून घेण्यासाठी जरा धैर्य बाळगा. च्शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी नव्हे तर साखर कारखान्यांचे हित जपण्यासाठीच महाराष्ट्रात धरणे बांधण्यात आली आहेत, असा आरोप सिंग यांनी केला. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा व्हावी अशी माझी मागणी आहे, जेणेकरून सत्य उघड होऊ शकेल.’च्सिंग यांच्या या आरोपावरून काँग्रेस सदस्य भडकले. यावेळी काँग्रेस आणि सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या. काही काँग्रेस सदस्यांनी सिंग यांच्याशी वाद घातला.