शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आमचं लक्ष्य एकच! सीरम, भारत बायोटेककडून वादावर पडदा; संयुक्त निवेदन प्रसिद्ध

By कुणाल गवाणकर | Updated: January 5, 2021 15:44 IST

भारतासह जगाला कोरोना लसींचा सुरळीत पुरवठा करण्यास कटिबद्ध; दोन्ही कंपन्यांचं संयुक्त निवेदन

मुंबई: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या कोरोना लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाल्यानंतर दोन्ही संस्थांकडून एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीका होत होती. लसीची परिणामकारकता आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही संस्था एकमेकांना लक्ष्य करत होत्या. मात्र आता या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही संस्थांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत याबद्दलची माहिती दिली आहे.भारताला आणि जगाला कोरोनावरील लसी लवकर उपलब्ध व्हाव्यात यासाठी दोन्ही कंपन्या एकत्रितपणे काम करतील, अशी माहिती संयुक्त निवेदनातून देण्यात आली आहे. 'भारताला आणि जगाला कोरोनावरील लसी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक कटिबद्ध आहे,' असं दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात नमूद केलं आहे. दोन्ही कंपन्या एकत्र येऊन लसीच्या उत्पादन आणि वितरणावर काम करतील, असा इरादादेखील निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.'भारत आणि जगभरातील लोकांचे जीव वाचवण्याचं मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. लसी या जगभरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. लोकांचं आयुष्य वाचवण्याची आणि अर्थचक्राचा गाडा रुळावर आणण्याची क्षमता लसींमध्ये आहे. उत्तम दर्जाच्या, सुरक्षित आणि प्रभावी लसींची निर्मिती, पुरवठा आणि वितरण यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे,' असं दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात पुढे म्हटलं आहे. 'दोन्ही कंपन्या लसींच्या उत्पादनावर आणि वितरणावर काम करत आहेत. कोरोना लसींचा सुरळीत पुरवठा करणं याला आम्ही देशाप्रती आणि जगाप्रती असलेलं कर्तव्य समजतो. आम्ही नियोजनानुसार हे काम सुरूच ठेवू. नागरिकांसाठी कोरोना लस किती महत्त्वाची आहे, याची जाणीव आम्हाला आहे. संपूर्ण जगाला कोरोना लस पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,' असं सीरम आणि भारत बायोटेकनं म्हटलं आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या