हरीश गुप्ता, नवी दिल्लीनरेंद्र मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १६ ते १८ वर्षातील व्यक्तीने घृणास्पद गुन्हा केल्यास तो गुन्हा प्रौढ व्यक्तीने केला (लहान मुलाने नाही) असे समजले जाईल. तथापि, असा गुन्हा ‘प्रौढ’ व्यक्तीने केला आहे की ‘मुलाने’ याचा निर्णय बाल न्यायालय मंडळ (ज्युवेनाईल जस्टीस बोर्ड) काळजीपूर्वक तपासणी करून घेईल. राजधानी दिल्लीत डिसेंबर २०१२ मध्ये बसमध्ये तरुणीवर सहा जणांकडून झालेल्या बलात्कारात एक गुन्हेगार १७ वर्षांचा होता. या घटनेपासून गुन्हेगाराच्या वयाचा मुद्दा गांभीर्याने चर्चेस आला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत बाल न्याय विधेयक २०१४ ला सुचविलेली दुरुस्ती मान्य करण्यात आली.असा असेल प्रस्तावित कायदाबलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्णांमध्ये सहभागी किशोरवयीन आरोपींवर वयस्काच्या कायद्यानुसारच खटला चालविण्याच्या प्रस्तावाला अनेक मंत्र्यांनी समर्थन दिल्याचे ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले. प्रस्तावित सुधारित कायद्यानुसार गंभीर गुन्ह्णांमध्ये सहभागी किशोरवयीन मुलांचे वय १६ ते १८ वर्षे असल्यास आरोपी प्रौढ आहे किंवा नाही, याची शहानिशा बाल न्याय मंडळ करील. या मंडळात मानसोपचार आणि सामाजिक तज्ज्ञांचा समावेश असतो. बालहक्क कायद्याचे उल्लंघन होऊ नये हा त्यामागचा उद्देश असेल. या मंडळाने घेतलेल्या आढाव्याच्या आधारावरच आरोपी हा बालगुन्हेगार आहे की प्रौढ याचा निर्णय होईल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीचे वय होते २१यापूर्वी गंभीर गुन्ह्णांमध्ये सहभागी किशोरवयीन आरोपींचे वय २१ वर्षांवरील असल्यास त्याच्यावर प्रौढ व्यक्तीप्रमाणे गुन्हा दाखल केला जात होता. मुलांना देशात दत्तक दिले जात नसेल तर आंतरदेशीय दत्तक विधानासाठीचा कालावधी, शरण आलेल्या मुलांबाबत त्याचे पालक किंवा माता-पित्यांना फेरविचार करण्याचा कालावधीही वाढविण्यात आला आहे.
गंभीर गुन्ह्यासाठी १६ ते १८ वर्षांची मुले प्रौढ मानणार
By admin | Updated: April 23, 2015 05:11 IST